IPL Auction 2025 Live

Bangladesh: बांगलादेशात 150 लोकांच्या जमावाने ISKCON मंदिराची केली तोडफोड, पैसे आणि मौल्यवान वस्तू लुटल्या, अनेक जण जखमी

ढाका येथील इस्कॉन मंदिरावर अतिरेकी गट हल्ला करत असताना पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा दावाही संघटनेने केला आहे.

Bangladesh ISKCON Temple Attack (Photo Credit - Twitter)

बांगलादेशची राजधानी ढाका येथे गुरुवारी होळीच्या निमित्ताने 150 अतिरेक्यांनी एका हिंदू मंदिराची तोडफोड केली. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, येथील इस्कॉन राधाकांता मंदिरावर हल्ला झाला (Attack on ISKCON Temple) आहे. देशातील अल्पसंख्याक हिंदू समाजाच्या (Hindus in Bangladesh) कल्याणासाठी काम करणाऱ्या ‘व्हॉइस ऑफ बांगलादेशी हिंदू’ या संस्थेने हल्ल्यानंतरचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच मदतीचे आवाहन केले आहे. आपल्या ट्विटमध्ये व्हॉईस ऑफ बांगलादेशने लिहिले आहे की, 'शब-ए-बारातच्या रात्री अतिरेकी पुन्हा एकदा ढाका येथील वारी राधाकांता इस्कॉन मंदिरावर हल्ला करत आहेत. आम्ही सर्व हिंदूंना मंदिराच्या रक्षणासाठी आपली भूमिका बजावण्याचे आवाहन करतो. या ट्विटर हँडलवर हल्ल्याशी संबंधित फोटो शेअर करण्यात आली आहेत. ढाका येथील इस्कॉन मंदिरावर अतिरेकी गट हल्ला करत असताना पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा दावाही संघटनेने केला आहे.

रात्री आठच्या सुमारास झाला हा हल्ला

या प्रकरणी हिंदू अमेरिकन फाउंडेशन (HAF) ने अधिकृत वेबसाईटवर एक प्रेस रिलीझ देखील जारी केले आहे. ज्यामध्ये हाजी सफिउल्लाह यांच्या नेतृत्वाखाली 150 लोकांनी ढाक्याच्या वारी पोलीस ठाण्यातील 22 लालमोहन साहा स्ट्रीटवर असलेल्या इस्कॉन मंदिरावर हल्ला केल्याचे सांगितले आहे. ही घटना 17 मार्च रोजी रात्री 8 वाजता घडली. एचएएफच्या वतीने सांगण्यात आले आहे की, 'त्यांनी मंदिर, मूर्तीची तोडफोड केली आणि पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू लुटल्या. या हल्ल्यात किमान तीन हिंदू भाविक जखमी झाले आहेत. (हे ही वाचा ISIS नेत्याने कुटुंबासह स्वतःला बाॅम्बने उडवले, दहशतवादी संघटनेने नव्या प्रमुखाचे नाव केले जाहीर, अमेरिकेचाही निवेदनात उल्लेख)

Tweet

काय म्हणाले मानवाधिकार संचालक?

हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, मंदिरावर 150 लोकांच्या जमावाने हल्ला केला होता. ज्यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. एचएएफच्या मानवाधिकार संचालिका दिपाली कुलकर्णी म्हणाल्या, “एका आठवड्यापूर्वी, बांगलादेशातील बंगाली हिंदू नरसंहारादरम्यान ज्यांना मारले गेले, विस्थापित केले गेले आणि बलात्कार करण्यात आले त्यांची 51 वी जयंती संपूर्ण जगाने साजरी केली. मात्र या हत्याकांडाचा प्रभाव आजही कायम असल्याची आठवण अतिरेकी करत आहेत.