Kyrgyzstan Accident Video:किर्गिस्तानमध्ये मोठी दुर्घटना, अनियंत्रित ट्रकची 29 विद्यार्थ्यांना धडक, घटनेचा Video व्हायरल
या फेस्टिवलमध्ये आईस्क्रीम ट्रकने काही विद्यार्थ्यांना चिरडले आहे. या भीषण घटनेत मुले गंभीर आजारी झाले आहे.
Kyrgyzstan Accident Video: किर्गिस्तानच्या डोंगराळ भागात विद्यार्थ्यांच्या कल्चरल फेस्टिवल वेळीस धक्कादायक प्रकार घडला आहे. या फेस्टिवलमध्ये आईस्क्रीम ट्रकने काही विद्यार्थ्यांना चिरडले आहे. या भीषण घटनेत मुले गंभीर आजारी झाले आहे. तात्काळ मुलांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. हा अपघात एकाने फोनच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 29 मुलांना ट्रकने धडक दिली. व्हॅन सुमारे 30mph वेगाने धावत होती. (हेही वाचा- राफ्टिंग दरम्यान हिरोपंती दाखवणे एका व्यक्तीला पडले महागात, मार्गदर्शकाचे न ऐकता नदीत मारली उडी)
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सर्व विद्यार्थी आनंद लुटत असताना ही दुखद घडली आहे. ट्रकचे नियत्रंण सुटल्याने हा अपघात घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ फोनमध्ये कैद झाला आहे. आईस्क्रीम ट्रक विद्यार्थ्यांना चिरडत पुढे जाऊन एका भितींला धडकले आहे. अनियंत्रित ट्रकने अनेक विद्यार्थ्यांना धडक दिले. मुले जमिनीवर गंभीर अवस्थेत पडू राहिली. 29 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. यात 18 मुले गंभीर जखमी आहे तर तीन मुलांची प्रकृती गंभीर आहे.
इंग्रजी वृत्तपत्रकानुसार, व्हॅन चालक हॅंड ब्रेक लावणे विसरून गेला होता. त्यामुळे ही दुर्घटना घडना घडली होती. ९ ते १६ वयोगटातील मुले या दुर्घटनेत होते. अपघातानंतर फेस्टिवलमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. विद्यार्थांना तातडीने मदत करण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली आहे. या घटनेनंतर पालक आणि शिक्षकांनी चिंता व्यक्त केली आहे. शहरातील आरोग्य विभागाने या घटनेची दखल घेतली आहे. पोलिस यांचा पुढील तपास करत आहे. चालकावर कारवाई करा अशी मागणी पालकांनी केली आहे.