Chinese Woman Falls Into Volcano: फोटो काढणे बेतले जीवावर! इंडोनेशियन ज्वालामुखीमध्ये पडून ३१ वर्षीय चिनी महिलेचा मृत्यू

ज्वालामुखीच्या तोंडाशी जाऊन फोटो काढण्याचा महिलेचा प्रयत्न होता. मात्र, त्या प्रयत्नान महिला जीवानीशी गेली आहे.

Photo Credit -X

Chinese Woman Falls Into Volcano : जगप्रसिद्ध इजेन ज्वालामुखी इंडोनेशियात आहे. त्याला "ब्लू फायर" ज्वालामुखी (blue fire volcano) नावानेही ओळखले जाते. तो पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक तेथे येतात. मात्र, इंडोनेशियन ज्वालामुखी(Volcano) येथे फोटो काढताना एका 31 वर्षीय चिनी महिलेचा ज्वालामुखीत पडून मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ही घटना घडली. हुआंग लिहोंग नावाची ही महिला तिच्या पतीसोबत इंडोनेशिया टूरवर होती. जोडपे तेथे सूर्योदय पाहण्यासाठी थांबले होते. तेव्हा महिलेला ज्वलामुखीच्या तोंडाजवळ जाऊन फोटो काढण्याचा मोह झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा तिच्या कपड्यांमध्ये पाय अडकला आणि त्यातच ती ज्वालामुखीत पडली(Chinese woman falls into volcano). महिला 75 मीटर उंचीवरून खाली पडली आणि पडल्याने तिचा मृत्यू झाला. (हेही वाचा:Volcano Eruption Video: इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, स्फोटाचा व्हिडिओ व्हायरल, 828 नागरिक स्थलांतरीत )

जोडप्याच्या टूर गाईडने नंतर अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार त्याने महिलेला धोक्याविषयी वारंवार चेतावणी दिली होती. काठावर सुरक्षित अंतर ठेवा असे त्यांना वारंवार सांगितले होते. मात्र, महिला हळूहळू मागे सरकत होती. नंतर चुकून तिच्या लांब कपड्यांवर पाय अडकला आणि ती ज्वालामुखीत कोसळली.

विशेष म्हणजे, इंडोनेशियामध्ये सुमारे 130 सक्रिय ज्वालामुखी आहेत. "ब्लू फायर" ज्वालामुखीतून सल्फ्यूरिक वायू उत्सर्जित होतो ज्यामुळे निळ्या प्रकाशात आगीच्या ज्वाला दिसतात. ज्वालामुखीतून विषारी वायू उत्सर्जित होऊ लागल्याने काही दिवसांपूरर्वी अनेक लोकांना त्यांची घरे रिकामी करण्यास भाग पाडले होते. तर, 30 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif