3,000 Year old Cedar Tree Collapsed: शानशान वादळामुळे जपानमध्ये हाहाकार; 3,000 वर्ष जुने देवदार वृक्ष कोसळले

त्याचे खोड 8 मीटरचा घेराएवढे होत. क्योडो न्यूज आणि शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिकांना शनिवारी देवदार वृक्ष कोसळलेल्या आवस्थेत आढळले.

Photo Credit- X

3,000 Year old Cedar Tree Collapsed: दक्षिण-पश्चिम जपानमधील कागोशिमा प्रीफेक्चरमधील याकुशिमा बेटावरील 3,000 वर्षे जुने देवदार वृक्ष टायफून शानशानने (Typhoon Shanshan)आणलेल्या जोरदार वादळामुळे कोसळले, याबाबतची माहिती स्थानिक वृत्त संस्थांनी दिली. देवदार वृक्ष 26 मीटर उंच उभा होता. त्याचे खोड 8 मीटरचा घेराएवढे होत. क्योडो न्यूजच्या हवाल्याने शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिकांना शनिवारी देवदार वृक्ष कोसळलेल्या आवस्थेत आढळले.

याकुशिमा बेट, 1,000 वर्षांहून अधिक जुन्या "याकुसुगी" देवदार वृक्षांसाठी ओळखले जाते. 1993 मध्ये याकुशिमा बेटाला जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले गेले होते. मध्य जपानच्या पॅसिफिक किनाऱ्यावर आलेल्या वादळामुळे जोरदार वारे वाहत आहे. या वादळामुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थीत आत्तापर्यंत सात लोकांचा मृत्यू झाला आहे. 120 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, वादळी वारा आणि पुरामुळे 1,000 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे, असे स्थानिक माध्यमांनी सांगितले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif