18 Years of 9/11: जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात 3000 लोकांनी क्षणार्धात गमावला होता जीव

जगातील सर्वात शक्तिशाली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत (America) 9 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. अमेरिकेतील हा हल्ला आजवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे मानले जाते. आज या हल्ल्याला 18 वर्ष पूर्ण झाली आहेत.

9/11 दहशतवादी हल्ला (फोटो सौजन्य- Twitter/ANI )

जगातील सर्वात शक्तिशाली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत (America) 9 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. अमेरिकेतील हा हल्ला आजवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे मानले जाते. आज या हल्ल्याला 18 वर्ष पूर्ण झाली आहेत. अलकायदा यांच्याशी जोडलेल्या 19 दहशतवाद्यांनी 11 सप्टेंबर 2001 मध्ये चार विमानांचे अपहरण करत अमेरिकेला निशाण्यावर ठेवून आत्मघाती हल्ला केला होता.

दोन विमानांनी न्युयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन टोलेजंग इमारतीवर निशाणा साधला होता. तर तिसऱ्या विमानाने वॉशिंग्टन डीसी बाहेरील पेंटागन, चौथ्या विमानाने पेन्सिलवेनियाच्या एका शेतात हल्ला घडवून आणला होता. यामध्ये तब्बल 3000 लोकांनी क्षणार्धात त्यांचा जीव गमावला होता.

11 सप्टेंबर 2001 मध्ये अलकायदा (Al-Qaeda) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन (Osama bin Laden) याने अमेरिकत हा हल्ला घडवून आणण्याचा विचार केला होता. तसेच या हल्ल्याबाबत अंतिम स्वरुपात विचार करण्यासाठी 1988 मध्ये लादेन याने पहिली बैठक बोलावली होती. त्यानंतर न्युयॉर्क मधील ट्वीन टॉवर वर्ल्ड सिटी सेंटर आणि पेंटागनवर आत्मघाती हल्ला केला. तसेच या आत्मघाती हल्ल्यानंतर अफगाणिस्तान मध्ये तालिबान संघटना कमी झाली. आज ही 18 वर्षानंतर जवळजवळ 14.000 अमेरिकन सैनिक अफगाणिस्तानमध्ये तैनात आहेत.(World's Safest City: टोकियो ठरले जगातील सर्वात सुरक्षित शहर, कराची शेवटच्या पाचमध्ये; जाणून घ्या दिल्ली आणि मुंबईचे स्थान)

9/11 या दहशतवादी हल्ल्यात 2996 लोकांचा मृत्यू झाला. तर 6000 जण गंभीर जखमी झाले होते. तसेच 100 पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान सुद्धा शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यामुळे अमेरिकेला 10 बिलियन डॉलर्सचे नुकसान झाले. त्याचसोबत अर्थव्यवस्थेवर ही प्रचंड परिणाम झाला होता. मात्र या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिका संतापला होता. त्यामुळे एका गुप्त ऑपरेशनच्या माध्यमातून 2 मे 2011 रोजी पाकिस्तान मधील ऐटाबाद स्थित ओसामा लादेन याला ठार करण्यात आले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now