Kabir Jayanti 2022: महान कवी Kabir Das यांनी मांडलेली प्रेरक तथ्ये, जाणून घ्या

हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमेला कबीर जयंती असते. कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध होते. संत कबीर यांचा जन्म इ.स. 1149 साली झाला असे काहीजण मानतात. तसेच काहींच्या मते त्यांचा जन्म 1399 मध्ये झाला. कबीर हे हिंदू संत आहेत की सुफी संत आहेत याबाबत एकमत नाही. असे असले तरी कबीरांच्या साहित्यिक रचना दोन्ही संप्रदायांना समान आदर देतात.

कबीरदास यांच्या उपदेशाने त्यांनी समस्त मानवजातीला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. कबीरदास यांनी समाजात पसरलेल्या वाईट चालिरीतींवर आपल्या उपदेशांमधुन कडाडुन विरोध केला.संत कबीरांचे उपदेश प्रत्येकाच्या मनात नव्या उर्जेचा संचार करतात. कबीर मुस्लिम कुटूंबात रहात होते, तरी ते आदिरामाचे उपासक होते. संत कबीर यांनी लिहिलेले बहुतांश दोहे हे विज्ञानवादी आणि बुद्ध धम्माचा प्रभाव असणारे आहेत. संत कबीर हे सत्य, विज्ञान व कर्मसिद्धान्त यांवर लिहीत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर यांना गुरू मानले. एवढ्या शतकानंतरही महान संत कबीर यांनी लिहिलेले दोहे आजही समर्पक वाटतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement