Zohra Segal Google Doodle: जोहरा सेहगल यांच्या स्मरणार्थ गुगलने आपल्या खास शैलीत डूडल बनवून या दिवंगत अभिनेत्रीला दिली अनोखी मानवंदना!
दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल यांच्या स्मरणार्थ हे खास डूडल (Google Doodle) तयार केले आहे. या डूडलचे वैशिष्ट्य म्हणजे यात जोहरा त्यांच्या लोकप्रिय अशा डान्स पोज मध्ये दिसत आहे. हे डूडल पार्वती पिल्लाई यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलं आहे.
ब्लॅक अँड व्हाईट हिंदी चित्रपटांमधील (Hindi Movie) 'ए मेरी जोहरा जबीं' (Ae Meri Zohra Jabeen) हे गाणे जेव्हा जेव्हा कानावर पडते तेव्हा एकच सुंदर, निरागस चेहरा डोळ्यासमोर येतो तो या गाण्यातील अभिनेत्री 'जोहरा सेहगल.' (Zohra Segal) हिंदी सिनेसृष्टीत 19 व्या दशकातील काळ गाजवणा-या या अभिनेत्रीने अवघ्या या सिनेसृष्टीला आपली भुरळ पाडली होती. त्यांचे हिंदी सिनेसृष्टीतील योगदान खूपच अमूल्य आहे. म्हणून त्यांच्या कामाची दखल घेत सर्च इंजिन गुगलने दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल यांच्या स्मरणार्थ हे खास डूडल (Google Doodle) तयार केले आहे. या डूडलचे वैशिष्ट्य म्हणजे यात जोहरा त्यांच्या लोकप्रिय अशा डान्स पोज मध्ये दिसत आहे. हे डूडल पार्वती पिल्लाई यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलं आहे.
गुगलने आजच्या दिवशी जोहरा सेहगल यांचे खास डूडल बनविण्यामागचे कारण म्हणजे 1946 मध्ये जोहरा सेहगल याचा 'नीचा नगर' (Neecha Nagar) हा चित्रपट आंतरराष्ट्रीय कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला पहिला भारतीय चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाला या फेस्टीव्हलमधील सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच 'द पाल्म डीयोर' पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे त्यांच्या या अद्भूत यशाबद्दल त्यांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ हे खास गुगल डूडल बनविण्यात आले आहे. Zohra Segal Google Doodle: जोहरा सेहगल यांच्या स्मरणार्थ गुगलने आपल्या खास शैलीत डूडल बनवून या दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्रीला दिली अनोखी मानवंदना!
जोहरा सेहगल या जितक्या चांगल्या अभिनेत्री होत्या तितक्या उत्कृष्ट त्या नृत्यांगणाही होत्या. त्यामुळे या डूडलमध्ये त्यांची आयकॉनिक डान्स पोज आपल्याला दिसत आहे. जोहरा यांचा जन्म 27 एप्रिल 1912 रोजी सहारनपूरमध्ये झाला होता. त्यांनी जर्मनीमधील ड्रेसडेनमधील बॅलेट स्कूलमधून नृत्याचे प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर प्रख्यात नर्तक उदयशंकर यांच्यासमवेत आपली कारकीर्द 1935 मध्ये सुरू केली. सेहगल यांनी विविध नाटके, दूरचित्रवाणीवरील अनेक मालिकांसह त्यांनी बॉलीवूड व इंग्रजी चित्रपटांमध्येही चरित्र भूमिका केल्या होत्या. ‘ग्रॅण्ड ओल्ड लेडी’ या नावाने बॉलीवूडमध्ये परिचित असलेल्या जोहरा यांनी 2007 मध्ये शेवटची भूमिका रंगविली होती.
अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीने 10 जुलै 2014 मध्ये जगाचा निरोप घेतला. तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 102 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)