Zee5 HiPi शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म लॉन्च, युजर्सला TikTok ची कमतरता नाही जाणवणार
TikTok वर बंदी घातल्यानंतर युजर्सला याची कमतरता भासणार नाही आहे. याच कारणास्तव Zee HiPi शॉर्ट व्हिडिओ अॅप भारतात लॉन्च केला असून याची खासियत म्हणजे 18 वर्षावरील लोकांनाच वापरता येणार आहे.
Zee5 ने आत्मनिर्भर भारत योजनेत आपले योगदान देण्यासाठी भारतात बहुप्रतिक्षित असा प्रोजेक्ट HiPi शॉर्ट व्हिडिओ अॅप लॉन्च केला आहे. TikTok वर बंदी घातल्यानंतर युजर्सला याची कमतरता भासणार नाही आहे. याच कारणास्तव Zee HiPi शॉर्ट व्हिडिओ अॅप भारतात लॉन्च केला असून याची खासियत म्हणजे 18 वर्षावरील लोकांनाच वापरता येणार आहे. या अॅपमध्ये युजर्सला मल्टीपल फिचर्सची सुविधा मिळणार आहे. याच्या माध्यमातून युनिक कंन्टेंट तयार करता येणार आहे. सध्या हे अॅप बीटा वर्जनसाठी उपलब्ध आहे.(Google ‘People Cards’ Launched in India: गुगल सर्चमध्ये Public Profile बनवण्यासाठी पीपल कार्ड फिचर भारतात लॉन्च; कसे तयार कराल तुमचे पीपल कार्ड?)
अॅपचा उपयोग करण्यासाठी वयाची 18 वर्ष पूर्ण आणि त्याहून अधिक असलेल्या युजर्सला त्याचा लाभ घेता येणार आहे. कंपनीने या प्लॅटफॉर्मवर वेरिफिकेशनची सुविधा सुद्धा उपलब्ध करुन दिली आहे. या अॅपवर अकाउंट तयार करताना युजर्सला जन्मतारीख विचारली जाणार आहे. Zee HiPi संदर्भात गेल्या महिन्यात माहिती समोर आली होती. त्यानंतर एका महिन्याने कंपनीने याचे बीटा वर्जन युजर्ससाठी रोलआउट केले आहे. हे अॅप सध्या फक्त अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध आहे. परंतु लवकरच iOS प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध करुन दिले जाणार आहे. कंपनीने त्यांच्या प्लॅटफॉर्मकडे युजर्स आकर्षित व्हावे यासाठी 400 हून अधिक इंफ्लुएंसर्सला अप्रोच केले आहे.
Zee5 HiPi मध्ये युजर्सला मल्टीपल फिचर्स सुविधा देणार आहे. याच्या मदतीने युजर्सला आपले टॅलेंट दाखवता येणार आहे. ऐवढेच नव्हे तर व्हिडिओला युनिक फिल्टर्स आणि इफेक्ट्सच्या मदतीने खास बनवता येणार आहे. या अॅपमध्ये 90 सेकंदाचा व्हिडिओ तयार करता येणार आहे. यामध्ये म्युझिक ट्रॅक, फिल्टर्स आणि व्हिजुअल इफेक्ट्स सारखे फिचर्स ही दिले जाणार आहेत. यामध्ये युजर्सला 100 हून अधिक व्हिडिओ आरामात पाहता येणार आहेत. त्याचसोबत ते लाईक्स आणि शेअर सुद्धा करता येऊ शकणार आहेत.(WhatsApp युजर्सला Picture In Picture मोडमध्ये पाहता येणार ShareChat व्हिडिओ)
झी चा हा एक शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे जो भारतीयांमध्ये TikTok ची कमतरता पूर्ण करणार आहे. सरकारने युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेता जून महिन्यात एकत्रितपणे 59 चीनी अॅपवर बंदी घातली. यामध्ये लोकप्रिय अॅप TikTok चा सुद्धा सहभाग आहे.