YouTube ची घोषणा, COVID19 लसीकरणासंबंधित चुकीच्या माहितीचे व्हिडिओ करणार ब्लॉक
सोशल मीडिया कंपनी फेसबुक आणि ट्विटर नंतर आता युट्युबकडून (YouTube) कोविड19 लसीकरणासंबंधित चुकीची माहिती देणारे व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवरुन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोशल मीडिया कंपनी फेसबुक आणि ट्विटर नंतर आता युट्युबकडून (YouTube) कोविड19 लसीकरणासंबंधित चुकीची माहिती देणारे व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवरुन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने असे म्हटले की, या व्हिडिओ मध्ये लसीकरणासंबंधित चुकीची माहिती दिली जात होती. वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्ट्सनुसार, युट्युबने रॉबर्ट एफ कॅनेडी ज्युनियर आणि जोसेफ मर्कोलासह काही कार्यकर्त्यांनी चॅनलला ब्लॉक केले आहे. या व्यतिरिक्त मोठ्या संख्येने चुकीची माहिती देणारे व्हिडिओ सुद्धा हटवण्यात आले आहेत.
युट्युबने नुकत्याच जर्मनी मध्ये दाखवण्यात येणाऱ्या रुसच्या चॅनलला ब्लॉक केले आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, या चॅनलने कोविड19 संबंधित चुकीच्या सूचना नियमांचे उल्लंघन केले आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रपती कार्यालय क्रेमलिन यांनी म्हटे की, युट्युबने चॅनल बंद करुन रुसीचे कायदे मोडले आहेत.(Nokia Launch Purebook S14 Laptop: नोकियाचा दमदार प्योरबुक एस 14 लॅपटॉप लाँच, ही आहेत वैशिष्ट्ये आणि किंमत)
दरम्यान, युट्युबने ऑगस्ट महिन्यात आपल्या प्लॅटफॉर्मवरुन 10 लाख व्हिडिओ हटवले होते. ज्यामध्ये कोरोना व्हायरस संबंधित चुकीची माहिती पसरवली जात होती. त्याचसोबत या व्हिडिओ मध्ये खोट्या पद्धतीने उपचाराबद्दल ही सांगितले जात होते. कंपनीने असे म्हटले की, अशा प्रकारचे व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरुन हटवणे अत्यंत गरजेचे होते.
तर येत्या काळात युट्युबचे एक नवे फिचर युजर्ससाठी रोलाआउट केले जाणार आहे. मात्र अद्याप त्यावर काम सुरु आहे. त्याचे नाव चॅप्टर फिचर आहे. हे फिचर आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंग Algorithms तंत्रज्ञानावर काम करणार आहे. हे फिचर आल्यानंतर व्हिडिओ क्रिएटर्सला व्हिडिओ अपलोड दरम्यान मॅन्युअली चॅप्टर जोडण्याची गरज भासणार नाही आहे.