Year Ender 2019: या वर्षात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले Top 5 'Dating Apps'

चला तर मग पाहूयात कोणते आहेत हे Top 5 Dating Apps:

Dating Apps (Photo Credits:Wikimedia Commons)

Top 5 Dating Apps in 2019: हे वर्ष डिजिटल विश्वात खूपच नवनवीन विक्रम घडविणारे होते. या वर्षात अनेक गॅजेट्स लाँच झाले. त्याचबरोबरच काही नवनवीन अॅप्सही लाँच झाले. यात तरुणाईला भुरळ पाडली ती डेटिंग अॅप्सनी. आतापर्यंत आपण गेम्स, चॅटिंगचे असंख्य अॅप पाहिले होते. मात्र सध्या ऑनलाईन डेटिंग हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून प्रचंड प्रमाणात वाढत चालला आहे. हे प्रमाण लक्षात घेता अनेक ऑनलाईन डेटिंग अॅप आले. यात काही अॅप्सनी तर अक्षरश: जोडपी तयार केली. यात काही जोडपी तयार झाली तर काही फसली. मात्र तरुणाईने झटपट डेटिंग करण्याच्या या अॅप्सना अक्षरश: डोक्यावर घेतले.

यात 2019 मध्ये भारतातही हे काही Dating Apps प्रचंड लोकप्रिय झाले. चला तर मग पाहूयात कोणते आहेत हे Top 5 Dating Apps:

1) Tinder

2012 मध्ये लाँच झालेले हे डेटिंग अॅप गेल्या 2019 मध्ये खूपच जास्तच लोकप्रिय झाले. मोफत रजिस्ट्रेशन करुन सभासद झालेल्या तरुण-तरुणींना या अॅपच्या माध्यमातून अगदी सहजपणे आपले डेटिंग पार्टनर्स यावर मिळू लागले. केवळ एका Right आणि Left Swipe च्या माध्यमातून तु्म्ही तुमचे डेटिंग पार्टनर सिलेक्ट किंवा रिजेक्ट करु शकता.

2) Happn

या अॅपच्या माध्यमातून तुम्ही जगाच्या कुठल्याही कोप-यातून तुम्ही तुमच्या डेटिंग पार्टनर निवडू शकता. यात तुम्हाला तुमच्या पसंतीचा पार्टनर निवडता येऊ शकतो. तुम्हाला तुमचा Crush मिळाल्यानंतर तुम्ही त्याच्याशी चॅट करु शकता. Year Ender 2019: या वर्षातील सर्वाधिक Hit ठरलेले 'Top 5' Apps

3) OkCupid

हा अॅप 2004 साली लाँच झाला. मात्र ऑनलाईन डेटिंगचे फॅड वाढल्यामुळे हा अॅपही खूप चर्चेत आला. येथ तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार एका क्लिकवर मिळू शकतो.

4) Bumble

खास तरुणींसाठी हा विशेष अॅप बनविण्यात आला आहे. येथे सर्व महत्त्वाचे अधिकार मुलींना देण्यात आले आहे. मुली आपल्या खाजगी आयुष्याबाबत खूप आग्रही असतात. त्यामुळे येथे चॅटला पहिली सुरुवात ही मुलीकडून आली तरच तो मुलगा तिच्याशी ऑनलाईन चॅट करु शकतो.

5) TanTan

या अॅपमध्ये तुमचे एकदा रजिस्ट्रेशन झाले की, तुमचे प्रोफाईल पाहून तुम्हाला समोरचा व्यक्ती सिलेक्ट अथवा रिजेक्ट करु शकतो. ज्यांच्याशी तुमची प्रोफाईल मॅच होईल त्यांच्याशीच तुम्ही चॅट करु शकता. अन्य कोणाचेही मेसेजेस तुम्हाला येणार नाही.

या 5 ऑनलाईन अॅप्सनी तरुणाईला अक्षरश: भुरळ पाडली. कारण जगाच्या कोप-यातील कोणत्याही व्यक्तीसोबत तुमचे डेटिंग होणे अगदी सोपे झाले. या Apps ची वाढती प्रसिद्धी लक्षात घेता 2020 मध्येही असेच काही भन्नाट अॅप्स पाहायला मिळतील यात तिळमात्र शंका नाही.