Xiaomi येत्या 16 मार्चला लाँच करणार वायरलेस चार्जर, #CutTheCord वापरत सोशल मिडियावरुन दिली माहिती

#CutTheCord (वायरची गरज नाही) विना वायरचे उत्पादन सांभाळण्याची आता वेळ आली आहे असे या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

Xiaomi Wireless Charger (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi) लवकरच आपला नवीन वायरलेस चार्चर लाँच करणार आहे. येत्या 16 मार्चला हा चार्जर लाँच करणार असल्याचा एक छोटा व्हिडिओ सध्या या कंपनीने आपल्या सोशल अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये #CutTheCord हा हॅशटॅग वापरला आहे. या व्हिडिओत 16 मार्च तारीख दाखविण्यात येत आहे. या व्हिडिओतून जास्त खुलासा करण्यात आला नसला तरी कंपनी वायरलेस चार्जिंग सपोर्ट करण्यासाठी फोनसाठी एक वायरलेस चार्जर किंवा पॉवर बँक लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या व्हिडिओमध्ये 'आता वायर सांभाळून ठेवायची गरज नाही' असे कंपनीने म्हटले आहे. #CutTheCord (वायरची गरज नाही) विना वायरचे उत्पादन सांभाळण्याची आता वेळ आली आहे असे या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

पाहा व्हिडिओ:

शाओमीचा हा व्हिडिओ ६ सेकंदचा शॉर्ट आहे. या व्हिडिओत एक चार्जिंग सिम्बॉल आहे. ज्यात चारी बाजुनी एक वर्तूळ असून त्यात डॉट आहेत. ते चमकताना दिसत आहेत. त्यामुळे यावरून स्पष्ट होते हे उत्पादन चार्जिंगशी संबंधित आहे.

शाओमीने याआधी एक वायरलेस फास्ट चार्जरचा एक टीझर जारी केला होता. तो 40 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारा होता.