Xiaomi कडून MIUI 13 लॉन्च, 'या' स्मार्टफोनला मिळणार अपडेट्स

त्यानुसार कंपनीने चीनमध्ये लॉन्चिंगच्या वेळी ग्लोबल मार्केटमध्ये याच्या रोलआउट संदर्भात माहिती दिली होती. परंतु भारतीय मार्केटमधील डिटेल्स दिल्या नव्हत्या.

Xiaomi Mi 10i (Photo Credits: Xiaomi India)

MIUI 13 हे शाओमी अॅन्ड्रॉइ स्मार्टफोनसाठी धमाकेदार अपडेट्स आले आहे. त्यानुसार कंपनीने चीनमध्ये लॉन्चिंगच्या वेळी ग्लोबल मार्केटमध्ये याच्या रोलआउट संदर्भात माहिती दिली होती. परंतु भारतीय मार्केटमधील डिटेल्स दिल्या नव्हत्या. परंतु कंपनीने आता भारतात MIUI 13 च्या लॉन्चिंग तारखेबद्दल माहिती दिली आहे.कंपनीने दावा केला आहे की, MIUI अपडेटमुळे फास्टर स्टोरेज, हायर बॅकग्राउंड, प्रोसेस इफिशिएंसी, स्मार्ट प्रोसेसिंग आणि दीर्घकाळ बॅटरी लाइफ मिळणार आहे. तसेच नव्या MIUI 13 अपडेट एक सुपर वॉलपेपर, नोट्स माइंड मॅप्स, एन्हांन्स्ड कंट्रोल सेंटर, गेम टर्बोसह येणार आहे. या नव्या अपडेटमध्ये ऑप्टिमाइज फाइल्स स्टोरेज सिस्टिमवर उतरवले आहे. तसेच यामध्ये प्रोसेसर सुद्धा प्रायोरिटी ऑप्टिमायजेशनसह येणार आहे.

शाओमीकडून लॉन्च करण्यात आलेल्या MIUI 13 अपडेट हे काही निवडक स्मार्टफोनसाठी मिळणार आहे. मात्र लवकरच शाओमी आणि रेडमी डिवाइससाठी नवे अपडेट जारी करणार आहे. तर जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोनला मिळणार हे अपडेट.(Instagram Reels New Feature: आता इंस्टाग्राम रील्सवर 90 सेकंदांचा व्हिडिओ बनवता येणार आहे, नवीन फीचर लवकरच होणार लाँच)

Mi 11 Ultra, Mi 11X Pro, Xiaomi 11T Pro, Mi 11X, Xiaomi 11 Lite NE 5G, Mi 11 Lite, Redmi Note 10 Pro Max, Redmi Note 10 Pro, Redmi Note 10, Redmi 10 Prime (Redmi, Samsung आणि Oppo कंपनीचे शानदार स्मार्टफोन फेब्रुवारीत होणार लॉन्च, जाणून घ्या अधिक)

शाओमी इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी सुद्धा नव्या अपेडट संदर्भात ट्विट केले आहे. त्यांनी असे म्हटले की, अपडेट रोलआउट केल्यानंतर हे लवकरच शाओमी आणि रेडमी स्मार्टफोनसाठी सुद्धा उपलब्ध करुन दिले जाणार आहे.