Xiaomi Redmi Go चा आज तिसरा फ्लॅश सेल ; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

Android Go एडिशनवर काम करणारा हा कंपनीचा पहिला फोन आहे.

Xiaomi Redmi Go (Photo Credit-Twitter)

चीनी कंपनी Xiaomi ने भारतात आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन Redmi Go लॉन्च केला आहे. Android Go एडिशनवर काम करणारा हा कंपनीचा पहिला फोन आहे. Redmi Go ची टक्कर Samsung Galaxy J2 Core आणि Nokia 1 शी होईल. मार्च महिन्यात Redmi Go चे दोन सेल्स आयोजित करण्यात आले होते. तर तिसरा फ्लॅश सेल 4 एप्रिल रोजी ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर (Flipkart), कंपनीची अधिकृत वेबसाईट Mi.com आणि होम स्टोरवर आयोजित करण्यात आला आहे. आज दुपारी 12 वाजल्यापासून हा सेल सुरु होईल.

Redmi Go ची किंमत आणि ऑफर:

यात 1 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 4,499 रुपये आहे. हा फोन ब्लॅक आणि ब्लू रंगात उपलब्ध आहे. याच्या लॉन्च ऑफर अंतर्गत जिओ युजर्सला 2,200 रुपयांचा कॅशबॅक आणि 100 जीबीचा अतिरिक्त डेटा मिळत आहे. त्याचबरोबर एक्सिस बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ईएमआयचा पर्याय घेतल्यास 5% इन्टेंट डिस्काऊंट दिला जाईल.

Redmi Go फिचर्स:

यात 5 इंचाचा HD डिस्प्ले दिला असून याचे रिजोल्यूशन 720x1280 पिक्सल आहे. यात 8 जीबी इंटरनल स्टोरेज दिला असून मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून तुम्ही 128 जीबी पर्यंत हा स्टोरेज वाढवू शकता. हा फोन अॅनरॉईड गो ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. यात 8 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा एलईडी प्लॅशसह देण्यात आला आहे. त्यासोबतच 5 मेगापिक्सलचा एचडीआर सेंसर देखील यात आहे. फोनमध्ये मायक्रो यूएसबी आणि 3.5 एमएमचा ऑडिओ जॅक दिला आहे. तसंच फोनमध्ये 3000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.