IPL Auction 2025 Live

Xiaomi Mi 10i Online Sale आज दुपारी 12 वाजल्यापासून खास Amazon Prime Users सुरु; पहा खासियत आणि किंमत

Xiaomi Mi 10i असे या मॉडेल चे नाव असून आज दुपारी 12 पासून या फोनचा सेल सुरु होत आहे. हा सेल खासकरुन अॅमेझॉन प्राईम मेंबर्ससाठी असणार आहे.

Xiaomi Mi 10i (Photo Credits: Xiaomi India)

चायनीज स्मार्टफोन ब्रँड शाओमी (Xiaomi) ने त्यांचा नववर्षातील पहिला स्मार्टफोन मंगळवारी भारतात लॉन्च केला. Xiaomi Mi 10i असे या मॉडेल चे नाव असून आज दुपारी 12 पासून या फोनचा सेल सुरु होत आहे. हा सेल खासकरुन अॅमेझॉन प्राईम युजर्ससाठी (Amazon Prime Users) असणार आहे. त्यामुळे हा फोन खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या प्राईम मेंबर्ससाठी ही खास संधी आहे. तसंच इतर युजर्ससाठी हा फोन उद्या म्हणजेच 8 जानेवारी 2021 पासून उपलब्ध होणार आहे.

ही लॉन्च ऑफर असल्याने स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. आयसीआयसीआय बँकेतून खरेदी केल्यास 2000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट मिळत आहे. तसंच ईएमआयचा पर्यायही खुला आहे. अतिरिक्त 1000 रुपयांचे कुपन्स देखील प्राईम मेंबर्ससाठी दिले जात आहेत. त्याचबरोबर जिओद्वारे 10,000 रुपयांचे बेनिफीट्सही मिळत आहेत. हा स्मार्टफोन तीन वेरिएंट्स मध्ये उपलब्ध आहे. 6GB + 64GB, 6GB + 128GB & 8GB + 128GB. त्यापैकी 6GB + 128GB वेरिएंटची किंमत 21,999 रुपये असून टॉप-एंड वेरिएंट 8GB + 128GB ची किंमत 23,999 रुपये आहे. मात्र केवळ एन्ट्री लेव्हल वेरिएंट 6GB + 64GB सेलमध्ये नंतर उपलब्ध होईल.

Mi India Tweet:

Xiaomi Mi 10i (Photo Credits: Xiaomi India)

या स्मार्टफोन मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी + स्क्रिन 20:9 आस्पेक्ट रेशो आणि 120Hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहे. त्याचबरोबर त्यात क्वॉलकॉम स्पॅनड्रगन 750G SoC प्रोसेसर 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज सह देण्यात आला आहे. यात कॉड रिअर कॅमेरा 108MP + 8MP + 2MP + 2MP देण्यात आला असून 16MP चा सेल्फी कॅमेरा ही देण्यात आला आहे.