WhatsApp Update: व्हॉट्सअॅप लवकरचं आणणार Edit Messages चा पर्याय; Typo Error चे देखील होणार निराकरण

WABetaInfo च्या अहवालानुसार, नवीन आगामी WhatsApp एडिट बटन वापरकर्त्यांना टेक्स्ट मेसेज एडिट (Text Edit Messages) करण्यास अनुमती देईल.

WhatsApp | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

WhatsApp Update: मेटा-मालकीचे व्हॉट्सअॅप आता लवकरच एडिट पर्याय आणून तुमचे चॅटिंग पर्याय सुधारण्याची योजना आखत आहे. WABetaInfo नुसार, "ग्रुप पोल (Group Polls) आणि WhatsApp प्रीमियम (WhatsApp Premium) सारखी काही प्रमुख वैशिष्ट्ये विकसित होत असल्याची घोषणा केल्यानंतर WhatsApp अखेरीस Android, iOS आणि डेस्कटॉपसाठी WhatsApp बीटा मधील भविष्यातील अपडेटसाठी टेक्स्ट मेसेज एडिट करण्याच्या क्षमतेवर काम करत आहे."

WABetaInfo च्या अहवालानुसार, नवीन आगामी WhatsApp एडिट बटन वापरकर्त्यांना टेक्स्ट मेसेज एडिट (Text Edit Messages) करण्यास अनुमती देईल. एडिट संदेशाची मागील आवृत्ती तपासण्यासाठी कोणतीही एडिट हिस्ट्री नसेल. वेबसाइटने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटवरून असे दिसून आले आहे की, मेसेजिंग प्लॅटफॉर्म एक नवीन पर्याय विकसित करत आहे जो वापरकर्त्यांना संदेश पाठवल्यानंतर कोणत्याही टायपोचे निराकरण करू देईल. एडिट संदेशांच्या मागील आवृत्त्या तपासण्यासाठी एडिट इतिहास नसेल. (हेही वाचा - Meta Privacy Policy: मेटाने Facebook आणि Instagram साठी नवीन प्राइवेसी पॉलिसी केली जाहीर, घ्या जाणूुन)

WABetaInfo ने सांगितले, "हे वैशिष्ट्य विकसित होत असल्याने, वैशिष्ट्य रिलीझ होण्यापूर्वी त्यांच्या योजना बदलू शकतात. शिवाय, लोकांना त्यांचे संदेश एडिट करण्याची परवानगी देण्याच्या वेळेशी संबंधित तपशील सध्या अज्ञात आहेत.

अलीकडे, मेसेजिंग प्लॅटफॉर्मने घोषणा केली आहे की, ते इमोजी प्रतिक्रिया, मोठ्या फाइल्स आणि ग्रुप्ससह नवीन वैशिष्ट्ये आणत आहेत. कंपनीने म्हटले आहे की, एका गटात 512 लोकांना जोडण्याची क्षमता विकसित करत आहे. आतापर्यंत फक्त 256 लोकांना परवानगी देण्यात येते आहे.