WhatsApp वरुन ट्रेनचे PNR स्टेटस 'या' पद्धतीने मिळवता येणार, जाणून घ्या अधिक

ज्याच्या मदतीने एकमेकांसोबत चॅटिंग करण्याची अधिक मजा येते. त्याचसोबत व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून काही गोष्टी आणि माहिती सुद्धा मिळणे सोपे होते.

WhatsApp (Photo Credits: WhatsApp)

व्हॉट्सअॅप (WhatsApp) भारतात सर्वाधिक पॉप्युलर मेसेजिंग अॅप आहे. ज्याच्या मदतीने एकमेकांसोबत चॅटिंग करण्याची अधिक मजा येते. त्याचसोबत व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून काही गोष्टी आणि माहिती सुद्धा मिळणे सोपे होते. याच पार्श्वभुमीवर आता भारतीय रेल्वे संबंधित माहिती ऑनलाईन पद्धतीने व्हॉट्सअॅपवर मिळू शकणार आहे. यासाठी युजर्सला Railfy च्या नव्या फिचरची मदत घ्यावी लागणार आहे. फिचर रियर टाइम पीएनआर स्टेट्स आणि रेल्वे संबंधित माहिती प्रवाशांना व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करुन देते. त्याचसोबत प्रवासासाठी लागणारा वेळ, पीएनआर स्टेट्स, ट्रेन लेट, स्टेशन अलर्ट सारखी माहिती उपलब्ध करुन दिली जाणार आहे.(WhatsApp OTP Scam काय आहे? त्यापासून सुरक्षित कसे राहाल?)

आतापर्यंत प्रवाशांना ट्रेन संबंधित माहिती मिळवण्यासाठी विविध बेवसाईटचा आधार घ्यावा लागत होता. मात्र Railfy ने एका फिचरच्या मदतीने ट्रेनच्या बद्दल माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. अशा पद्धतीने WhatsApp च्या मदतीने PNR स्टेट्स बद्दल माहिती मिळवता येईल.(WhatsApp Tips and Tricks: हेडफोनशिवाय 'या' गुप्त पद्धतीने WhatsApp वरील मेसेज ऐकू शकता, जाणून घ्या अधिक)

-सर्वात प्रथम युजर्सला त्यांचे WhatsApp अपडेट करावे लागणार आहे. अॅन्ड्रॉइड युजर्स ते प्ले स्टोअर आणि आयफोन युजर्स Apple App Store मधून अपडेट करता येईल.

-त्यानंतर व्हॉट्सअॅपवर चौकशी क्रमांक +91-9881193322' सेव्ह करावा लागणार आहे.

-असे केल्यानंतर व्हॉट्सअॅपवर जाऊन New Message बटनवर क्लिक करावे लागणार आहे. Contacts लिस्ट मध्ये जावे लागणार आहे.

- Railofy कॉन्टॅक्ट निवडावा लागणार आहे. त्यानंतर मेसेज विंडो मध्ये 10 डिजिट पीएनआर नंबर द्यावा लागणार आहे.

-अशा पद्धतीने पीएनआर क्रमांक रेसवेला मिळणार आहे.

-त्यानंतर ट्रेनच्या रियर टाइम बद्दल माहिती व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे.

या सर्विसच्या मदतीने युजर्सला WhatsApp वर पीएनआर स्टेटससह रेग्युलर अपडेट्स ही माहिती मिळणार आहे. प्रत्येक महिन्याला 60 लाख प्रवासी गुगलवर IRCTC ट्रेनच्या स्टेशन संबंधित माहिती सर्च करतात.