WhatsApp Update: WhatsApp कडून एक नवा भन्नाट फिचर लॉंच, एका क्लीवर बघता येईल विविध चॅट्सची अपडेट
तर हा नवा अपडेट व्हॉट्सअप् स्टेटस बाबतीतला आहे.
व्हॉट्सअप आपल्या वापरकर्त्यांसाठी कायमचं नवनवीन फिचर घेवून येतो. किंबहुना २०२२ या वर्षभरात व्हॉट्सअप आपल्या युजरसाठी सर्वाधिक अपडेट घेवून आला आहे. तरी आता वर्षाच्या अखेरच्या महिन्यात व्हॉट्सअप जो फिचर घेवून आला आहे तो नक्कीचं तुमचं काम सोप्प करुन वेळ वाचवणारा आहे. तर हा नवा अपडेट व्हॉट्सअप् स्टेटस बाबतीतला आहे. तुम्ही तुमच्या कॉनटॅक्टसमध्ये सेव्ह असलेल्या सगळ्या नंबरचं स्टेटस बघू शकता पण आता त्यासाठी स्टेट्स ऑप्शनमध्ये जाण्याची काही गरज नाही. व्हॉट्सअपची मुख्य विंडो चॅट यातचं तुम्हाला आता कुठल्या कॉन्टॅक्ट्सने स्टेट्स शेअर केल याबाबत माहिती मिळणार आहे. तरी फक्त एका क्लीकमध्ये कुठल्या कॉन्टॅक्सने कुठले फोटो किंवा कुठला व्हिडीओ शेअर केला हे बघणं सहज शक्य होणार आहे.
तुम्ही तुमचं व्हॉट्सअप ओपन केलं की तिकडे तुम्हाला तिन मुख्य ऑप्शन दिसतात. चॅट, स्टेट्स आणि कॉल्स या तिन पैकी तुम्हाला कुणालचं स्टेटस बघायचं असल्यास तुम्हाला चॅट ऑप्शनवर जावून त्या त्या ठराविक ऑप्शनचं स्टेटस बघावं लागत. पण आता चॅट या ऑप्शनवरचं तुम्हाला कुठल्या कुठल्या कॉन्टॅक्टसने स्टेटस शेअर केलं आहे हे सहज दिसणार आहे. (हे ही वाचा:- WhatsApp Update: व्हॉट्सअॅप कडून नवा फिचर लॉंच, आता कुठलाही व्हॉट्सअॅप ग्रुप शोधा फक्त एका क्लीकवर)
तरी तुम्ही तुमचं व्हॉट्स अप ऑपन केलं की तुम्हाला तुमची होम स्क्रीन चॅट दिसते. त्यात ज्या कॉन्टॅक्टच्या डिपीवर म्हणजेचं डेक्सटॉप पिक्चरवर हिरवा रंगाचा गोल दिसतो. म्हणजेचं त्या कॉन्टॅक्टने स्टेटस शेअर केला असल्याचं कळते तर त्यावर लगेच क्लीक करुन तुम्ही त्या कॉन्टॅक्टचं स्टेटस बघू शकता. व्हॉट्स अपच्या या भन्नाट फिचरमुळे कुठल्या कॉन्टॅक्टेने नेमक काय स्टेट्स शेअर केलं हे फक्त एका क्लिकवर कळणार आहे.