WhatsApp Update: व्हॉट्सअॅप कडून नवनवीन फिचर लॉंच; कॅमेरा मोड, फॉन्ट, हॅप्टिक फीडबॅकसह अनेक भन्नाट अपडेट
व्हॉट्सअपचे हे नवे फिचर वापरकर्त्यांनां कधीपासून वापरता येईल हे निश्चित सांगता येत नसलं तरी येत्या आठवड्यात हे नवे फिचर्स लॉंच करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
व्हॉट्सअप हे जगभरात सर्वात जास्त वापरण्यात येणारं मेसेजींग अपलिकेशन आहे. व्हॉट्सअपद्वारे कित्येक अवघड वाटणारी काम आता सोपी झाली आहेत. व्हॉट्स अप कायमचं त्याच्या वापरकर्त्यासाठी भन्नाट फिचर घेवून येताना दिसतो. whataapp येणाऱ्या काही दिवसात काही नवे भन्नाट फिचर लॉंच करणार आहे. व्हॉट्सअपच्या या नव्या अपडेटमध्ये कॅमेरा मोड, फॉन्ट, हॅप्टिक फीडबॅक आणि बरेच नवनवीन अपडेट घेवून येणार आहे. व्हॉट्सअपचं नव्याने येणारं हे नवीन अपडेट अन्ड्रॉइड तसेच आयओएस अशा दोन्ही वापरकर्त्यांसाठी असणार आहे. कॅमेरा मोड, फॉन्ट, हॅप्टिक फीडबॅकसह आणखीही काही नवनवीन वैशिष्ट्य व्हॉट्सअपकडून लवकरचं लॉंच करण्यात येणार आहेत. व्हॉट्सअपचे हे नवे फिचर वापरकर्त्यांनां कधीपासून वापरता येईल हे निश्चित सांगता येत नसलं तरी येत्या आठवड्यात हे नवे फिचर्स लॉंच करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
तरी तुम्हाला देखील तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअचे हे नवे फिचर्स वापरायचे असल्याचे अप स्टोअर किंवा आयओएसच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप अपडेट करत हे सगळे फिचर्स वापरता येणार आहेत. व्हॉट्स अॅपचे जगभरात करोडो वापरकर्ते आहेत. WhatsApp मेसेजिंग प्लॅटफॉर्म आणि WhatsApp बिझनेस असे दोन प्लाटफॉर्म व्हॉट्सअप वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅप मेसेंजरची लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी सतत नवीन अपडेट्स आणि फिचर्स घेवून येताना दिसते. (हे ही वाचा:- WhatsApp: तुमचं व्हॉट्सअॅप स्लो चालतयं? मग वापरा हा फंडा, व्हॉट्सअॅप चालणार नाही तर थेट पळणार)
‘हे’ असतील व्हॉट्सअप कडून नव्याने लॉंच करण्यात येणारे फिचर:-
- नवीन फॉन्ट:-
व्हॉट्सअॅपने 2.23.3.7 बीटा वापरकर्त्यांसाठी नवीन फॉन्ट फिचर घेवून येणार आहेत. या फिचरनुसार आता तुम्ही व्हॉट्सअपवर टाईपिंग करताना वेगवेगळे फिचर्स सहज वापरता येणार आहेत. तसेच या नव्या फिचरसह तुम्हाला तुमच्या मेसेजची अलाइंगमेंट सेट करता येणार आहे. तसेच, अलाइनमेंट टेक्स्ट मॅनेजर वापरल्याने तुमचा मजकूर इमेज, व्हिडिओ आणि GIF मध्ये सेव्ह करणे सोपे होणार आहे.
- नवीन कॅमेरा मोड:-
या नव्या फिचरसह तुम्ही तुमचा कॅमेराद्वारे हॅन्डस फ्री व्हिडीओ रेकॉर्ड करु शकता किंवा फोटो काढू शकता. तरी यासाठी तुम्हाला सर्वप्रथम व्हॉट्सअप अपडेट करणं अनिवार्य आहे.
- हॅप्टिक फीडबॅक:-
WhatsApp कडून Android वापरकर्त्यांसाठी नवीन हॅप्टिक फीडबॅक फिचर लॉंच करण्यात येणार आहे. या फिचरच्या माध्यमातून तुम्हाला जुन्या कुठल्ही मेसेजवर उद्देशून रिप्लाय देता येणार आहे. तरी या फिचरमुळे संभाषण अधिक सोपं होवू शकते.
- मेसेज एडिटींग:-
व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरच्या माध्यमातून तुम्हाला तुम्ही एकदा सेंड केलेला मेसेज सहज एडिट करता येणार आहे. सध्या तुम्हा तुमच्या कुठल्याही कॉन्टॅक्टला एखादा मेसेज पाठवला पण त्या मेसेज मधला काही मजकूर चुकीचा असला किंवा टाईपिंगमध्ये काही चूक झाल्यास तुम्हाला तो मेसेज थेट डिलीट करावा लागतो पण आता व्हॉट्सअपवर सेंड केलेला मेसेज तुम्हाला सहज एडिट करता येणार आहे.