WhatsApp Feature Update: आता व्हॉट्सअॅप वर तारखेवरून जुना मेसेज सर्च करण्याचा पर्याय देण्यासाठी काम सुरू
या फीचरच्या मदतीने युजर तारखेच्या मदतीने मेसेज मध्ये चॅट सर्च करू शकणार आहेत.
चॅट मध्ये कोणता जुना मेसेज शोधायचा असेल तर त्यासाठी खूप खटपट असते. अनेकदा चॅट बॉक्स उघडून लांब यादी मध्ये सर्च करावं लागतं. पण आता लवकरच व्हॉट्सअॅप (WhatsApp) कडून युजर्सचा हा त्रास कमी होणार आहे. Meta ची मालकी असलेलं व्हॉट्सअॅप यासाठी टेस्टिंग करत असल्याची माहिती मीडीया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे. या नव्या फीचर मधून युजर्स त्यांचा जूना मेसेज तारखेवरून (Search message by date) आता शोधू शकणार आहेत. सध्या हे फीचर डेव्हलपमेंट मोड मध्ये आहे.
Wabetainfo च्या लेटेस्ट रिपोर्ट्स मध्ये व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरची माहिती देण्यात आली आहे. रिपोर्ट पाहिला तर कंपनी ‘Search message by date’हे फीचर लवकरच घेऊन येऊ शकतं. या फीचरच्या मदतीने युजर तारखेच्या मदतीने मेसेज मध्ये चॅट सर्च करू शकणार आहेत.
wabetainfo रिपोर्ट मध्ये त्याचा स्क्रिनशॉर्ट शेअर करण्यात आला आहे. स्क्रिनशॉर्ट पाहिला तर तुम्हांला समजेल त्यामध्ये एक नवीन कॅलेंडर आयकॉन देण्यात आला आहे. या कॅलेंडर मध्ये तुम्ही तारखेवरून त्या दिवसाचं चॅट पाहू शकाल. सध्या युजर्स हे पाहू शकत नाहीत कारण ते डेव्हलपमेंट स्टेज मध्ये आहे. युजर्सपर्यंत येण्यासाठी अजून वेळ लागू शकतो.
व्हॉट्सअॅप सतत युजर्सच्या सोयीसाठी नवनवी फीचर्स आणत असतो. यामध्ये व्हॉट्सअॅप अवतार फीचर देखील सहभागी आहे. हा अवतार फीचर केवळ स्टिकर्स म्हणून नव्हे तर प्रोफाईल फोटो म्हणून देखील ठेवता येणार आहे. नक्की वाचा: WhatsApp 24 ऑक्टोबर पासून 'या' iPhones ला नाही करणार सपोर्ट .
आगामी फिचर्स मध्ये ग्रुप पोल फीचर आहे. तसेच ट्वीटर प्रमाणे एडीट चं फीचर असेल. टायपो एरर ने गेलेल्या मेसेज मध्ये आता एडीट करण्याचा पर्याय दिला जाणार आहे.