WhatsApp Privacy पॉलिसीसाठी नवे अपडेट येणार, युजर्सला मिळणार दिलासा
त्यानुसार कंपनी कथित रुपात लवकरच एक नवे अपडेट जाहीर करणार आहे.
WhatsApp Users साठी एक दिलासादायक बातमी आहे. त्यानुसार कंपनी कथित रुपात लवकरच एक नवे अपडेट जाहीर करणार आहे. जे युजर्सच्या नव्या प्रायव्हसी टर्म्सला ऑप्शन म्हणून वापरता येणार आहे. WaBetaInfo यांच्या एका रिपोर्ट्सनुसार, युजर्सला नवी प्रायव्हसी टर्म्स स्विकार करण्यास अनिवार्य केले जाणार नाही आहे. त्याचसोबत नवी पॉलिसी रिजेक्ट करण्याचे ही ऑप्शन मिळणार असून व्हॉट्सअॅप फंक्शन्स पर्यंत मर्यादित राहणार नाही आहे.
रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, लोक क्लाउड प्रोव्हाइडरचा वापर करणाऱ्या WhatsaApp Business अकाउंटला मेसेज देऊ इच्छितात, त्यांना नव्या टर्म्स ऑफ सर्विसला रिव्हू करणे आणि एक्सेप्ट करण्याची गरज असणार आहे. जे युजर्स बिझनेस अकाउंटवरुन कोणतेही बातचीत करत नाही त्यांना चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे. या अपडेट संबंधिक एक स्क्रिनशॉट सुद्धा शेअर करण्यात आला आहे. त्यात असे दिसते की, जेव्हा एखादा युजर बिझनेस अकाउंटवर मेसेज पाठवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला अॅपचे नव्या टर्म्स आणि सर्विस दाखवल्या जातील.(YouTube ने हटवले 10 लाखांहून अधिक व्हिडिओ, जाणून घ्या त्यामागील कारण)
मेसेजमध्ये असे म्हटले आहे की, व्हॉट्सअॅपने नुकत्याच आपल्या टर्म्स आणि प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. बिझनेस चॅट मॅनेज करण्यासाठी Facebook कंपनी एक सिक्युअर सर्विसचा वापर करते. बिझनेससह चॅट करम्यासाटी व्हॉट्सअॅप अपडेटला रिव्हू करा आणि ते एक्सेप्ट करा. युजर्सला Not Now आणि Review सह दोन ऑप्शन दिसून येणार आहेत. WaBetaInfo ने असा सुद्धा दावा केला आहे की, मेसेजिंग अॅप लवकरच याची घोषणा करणार आहे. त्याचसोबत अॅन्ड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही युजर्सला व्हॉट्सअॅप बीटावर एक अपडेट जाहीर केले जाणार आहे.