भारतातील 'या' 4 मोठ्या बँकांसोबत WhatsApp Pay ची पार्टनरशीप; तब्बल 20 लाख युजर्संना घेता येईल डिजिटल पेमेंटचा लाभ
व्हॉट्सअॅप ने लॉन्च केलेले नवे फिचर WhatsApp Pay आजपासून भारतात लाईव्ह झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँक सोबत टायअप करुन हे फिचर आजपासून तब्बल 20 मिलियन युजर्सच्या दमतीला हजर झाले आहे.
व्हॉट्सअॅप (WhatsApp) ने लॉन्च केलेले नवे फिचर WhatsApp Pay भारतात लाईव्ह झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि अॅक्सिस बँक (Axis Bank) सोबत टायअप करुन हे फिचर आजपासून तब्बल 20 लाख युजर्सच्या दमतीला हजर झाले आहे. दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर व्हॉट्सअॅप पेमेट सर्व्हिसला नॅशनल कोर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation of India) कडून नोव्हेंबर मध्ये मंजूरी मिळाली. व्हॉट्सअॅप पेमेंट सर्व्हिस ही युपीआय (UPI) वर आधारीत 160 बँकांसह काम करणार आहे. (WhatsApp Carts Feature मुळे आता व्हॉट्सअॅप वर शॉपिंगचा अनुभव होणार अधिक सुकर; पहा कसं वापराल हे फीचर)
UPI ही एक डिजिटल ट्रान्जॅक्शनसाठी अनोखी सर्व्हिस आहे. आपल्या देशातील डिजिटल इकोनॉमीला पुढे आणण्यासाठी ही एक खूप मोठी संधी आहे. भारतामध्ये अशा बहुतांश युजर्स आहेत ज्यांनी अजून युपीआयचा उपभोग घेतला नाही. अशा सर्व युजर्ससाठी ही संधी चालून आली आहे, अशी माहिती व्हॉट्सअॅप इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांनी 'Fuel for India'या फेसबुकच्या कार्यक्रमादरम्यान दिली आहे.
भारतातील स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँक यांसोबत पार्टनरशिप करून साधं, सुरक्षित असे डिजिटल पेमेंट भारतभरातील सर्व व्हॉट्सअॅप युजर्ससाठी घेऊन येत आहोत, असे बोस म्हणाले.
पीअयर टू पीयअर पेमेंट फिचर 10 भारतीय प्रादेशिक भाषेत व्हॉट्सअॅपवर उपलब्ध आहे. रिपोर्टनुसार, बंगळुरु स्थित रिसर्च कंपनी RedSeer यांना 2025 च्या आर्थिक वर्षाखेरपर्यंत 94 ट्रिलियन डॉलर पर्यंतचे डिजिटल ट्रान्सजॅक्शन होण्याचा अंदाज बांधला आहे.
एप्रिल मध्ये व्हॉट्सअॅपवर बँकिंग सर्व्हिस लॉन्च झाली. तब्बल 20 लाखांपेक्षा अधिक युजर्सने या बॅंकिंग सर्व्हिसचा लाभ घेतला. आता व्हॉट्सअॅप पेमेंट्सचा वापर करुन देशभरातील कोणत्या युजरला तुम्ही डिजिटली पैसे पाठवू शकाल, अशी माहिती आयसीआयसी बॅंकच्या डिजिटल चॅनलचे हेड बिजित भास्कर यांनी दिली.
व्हॉट्सअॅप पे सोबत पार्टनरशिप करणे हे खूप महत्त्वाचे पाऊल आहे. सर्व भारतीयांसाठी सोयीस्कर आर्थिक व्यवहार घडवून आणणे हा यामागील मुख्य हेतू असेल. अशा पार्टनरशीपमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळेल, अशी माहिती एचडीएसशी बँकेच्या डिजिटल बँकिंग आणि मार्केटिंगचे हेड पराग राव यांनी दिली.
एसबीआय ने सुद्धा व्हॉट्सअॅप सोबत पार्टनरशीप केली असून व्हॉट्सअॅप पेमेंटचा वापर करुन एसबीआय युपीआय युजर्स त्वरीत कोणालाही पैसे पाठवू किंवा स्वीकारु शकतात. व्हॉट्सअॅप पेमेंटमध्ये स्ट्रॉंग सिक्युरीटी फिचर वापरले असून प्रत्येक ट्रान्जॅक्शनला युजर्सला युपीआय पीन टाकणे अनिवार्य आहे. भारतामध्ये व्हॉट्सअॅप पेमेंटला टक्कर देणारे पेटीएम गुगल पे आणि फोन पे हे मोठे अॅप्स आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)