नको असलेल्या WhatsApp Groups मुळे त्रस्त आहात? हे नवे फिचर करेल तुमची मदत

पण अनेकदा आपल्याला काही whatsapp ग्रुप्स कंटाळवाणे वाटतात किंवा काहींमध्ये सहभागी होण्याची देखील आपली इच्छा नसते.

WhatsApp (Photo Credits: WhatsApp)

आपल्यापैकी अनेकजण सातत्याने whatsapp चा वापर करत असतात. पण अनेकदा आपल्याला काही whatsapp ग्रुप्स कंटाळवाणे वाटतात किंवा काहींमध्ये सहभागी होण्याची देखील आपली इच्छा नसते. युजर्सचा whatsapp group बद्दलचा हा त्रास लक्षात घेऊनच इंस्टन्ट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नवे फिचर केले आहे. या नव्या फिचरमुळे तुम्ही whatsapp वरील नको असलेले ग्रुप टाळू शकता. बीटा व्हर्जनसाठी व्हॉट्सअपचे नवे डिझाईन तयार, तुम्ही पाहिले का?

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, मेसेजिंग अॅप नवनव्या सुधारणा करत आहे. नवे ग्रुप फिचर लवकरच आयओएस (ios) आणि अॅनरॉईड (Android) ऑपरेटिंग सिस्टमवर उपलब्ध होईल. हे फिचर अॅक्टीव्ह करण्यासाठी तुम्हाला सेटिंग्समध्ये काही बदल करावे लागतील.

सेटिंग मेन्यू मध्ये जा. त्यात Account> Privacy> Groups मध्ये जा. त्यात युजर्सला 'Who Can Add Me To Group' चा पर्याय दिसेल. यात तीन ऑप्शन्स असतील- Everyone, My Contacts आणि Nobody. तुम्ही यापैकी एकाची निवड करु शकता. लास्ट सीन, प्रोफाईल फोटो, अबाऊट आणि स्टेटस फिचरप्रमाणेच हे फिचर देखील काम करेल. फेक न्युज शेअरिंगला आळा घालण्यासाठी WhatsApp कडून 20 लाखाहून अधिक अकाऊंट्स बंद

My Contacts हा पर्याय निवडल्यास जेव्हा कोणी तुम्हाला नव्या ग्रुपमध्ये अॅड करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल. जर युजर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असेल तर तुम्ही ग्रुपमध्ये ऑटोमेटिक अॅड व्हाल. जर Nobody या पर्यायाचा वापर केल्यास 72 तासांत तुम्हाला इनव्हाईटचा रिप्लाय करावा लागेल. अन्यथा इनव्हाईट कॅन्सल होईल. Everyone हा पर्याय कमी युजर्सकडून वापरला जाईल. पण त्यामुळे कोणीही तुम्हाला whatsapp group मध्ये अॅड करु शकेल.