WhatsApp Carts Feature मुळे आता व्हॉट्सअ‍ॅप वर शॉपिंगचा अनुभव होणार अधिक सुकर; पहा कसं वापराल हे फीचर

यामुळे ग्राहकांना एका वेळेस अनेक वस्तू ऑर्डर करण्याची मुभा मिळणार आहे.

WhatsApp Carts (Photo Credits; WhatsApp)

WhatsApp मध्ये सतत्याने नवी फीचर्स अपडेट करून युजर्सना नवनव्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आता नुकतीच व्हॉट्सअ‍ॅपने Carts चा पर्याय त्याच्यामाध्यमातून शॉपिंग करण्याचा अनुभव अधिक सुकर करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान महिन्याभरापूर्वीच शॉपिंग बटन फीचर जोडण्यात आलं होतं. व्हॉट्सअ‍ॅप वरील हे कार्ट फीचर ई कॉमर्स साईटवरील 'अ‍ॅड टू कार्ट' प्रमाणेच काम करणार आहे. यामुळे ग्राहकांना एका वेळेस अनेक वस्तू ऑर्डर करण्याची मुभा मिळणार आहे. WhatsApp OTP Scam काय आहे? त्यापासून सुरक्षित कसे राहाल?

व्हॉट्सअ‍ॅपच्या दाव्यानुसार, भारतामध्ये 175 मिलियन युजर्स दररोज बिझनेस अकाऊंटमध्ये इंटरअ‍ॅक्ट करत असतात. तर 3 मिलियन लोकं प्रत्येक महिन्यात बिझनेस कॅटलॉग पाहतात. मग आता हा शॉपिंगचा अनुभव अधिक सुकर करण्यासाठी खास अपडेट्स जाहीर करण्यात आले आहेत. Whatsapp Business Customers: व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी 'या' युजर्संला भरावे लागणार पैसे; कंपनीने दिली माहिती

कसं वापराल कार्ट फीचर?

आजपासून जगभरात व्हॉट्सअ‍ॅपने कार्टसचं फीचर लाईव्ह करायला सुरूवात केली आहे. लवकरच सर्व अकाऊंट्सवर ते पाहता येईल. दरम्यान बिझनेस अकाऊंट्सना देखील कॅटलॉग लाईव्ह करावे लागणार आहेत. ज्यामुळे हे कार्ट्सचं फीचर काम करू शकेल.