WhatsApp Down in India: भारतात व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याने सोशल मिडियावर मजेशीर Memes चा पाऊस

यावर अनेकांनी सोशल मिडियावर तक्रारी सुरु केल्या.

WhatsApp Down and Memes (Photo Credits: Twitter)

सध्याच्या डिजिटल दुनियेत लोकांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक झालेला व्हॉट्सअॅप डाऊन (WhatsApp Down) झाले आहे. WhatsApp च्या प्रायव्हसी सेटिंग्स काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात रात्री 8.39 पासून Privacy Settings अपडेट करण्यास युजर्सला समस्या निर्माण होत आहेत. यासंदर्भात ट्विटरसह सोशल मिडियावर (Social Media)  तक्रारी येण्यास सुरुवात झाल्यानंतर ट्विटरवर (Twitter) मजेशीर मिम्सचा (Memes) देखील पाऊस पडला आहे.

WhatsApp डाऊन झाल्यामुळे Privacy Settings मध्ये कोणतेही बदलाव करता येत नाही आहे.त्यासोबतच युजर्सचे Last seen ही जवळपास 8.30 ते 8.45 दरम्यानचे दाखवत आहेत. युजर्संना ऑनलाईन (Online), टायपिंग (Typing) या गोष्टी दिसत नाहीय.  यावर अनेकांनी सोशल मिडियावर तक्रारी सुरु केल्या. डाऊन डिटेक्टर नुसार मागील 2 तासांपासून व्हॉट्सअॅप युजर्सला कनेक्शन संबंधी च्या अनेक अडचणी येत आहेत.

रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप संबंधी आतापर्यंत 4000 तक्रारी आल्या आहेत. ज्यात 73% युजर्सला Last Seen दिसत नाही आहे. तर 27% युजर्सला कनेक्शन संबंधी समस्या येत आहे. व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याने प्रायव्हसी सेटिंग देखील बदलता येत नसल्याने युजर्स संभ्रमात पडले आहेत.

या तक्रारींसह मजेशीर मिम्सचा देखील सुळसुळाट सुरु झाला. ज्यात अनेक युजर्स अस वर्षातून एकदा झालं तर किंवा तुझा लास्ट सीन मला दिसत नाही म्हणू आपण ब्रेक अप करूया असे मिम्स दिसत आहे. WhatsApp Payments द्वारे पैशांची देवाण घेवाण कशी कराल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स

व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्यावर युजर्सनी ट्विटरवर याबाबत ट्रेंड सुरू केला आहे. #whatsappdown यावर अनेक युजर्स आपली नाराजी व्यक्त करत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif