IPL 2019 साठी WhatsApp ने आणले नवे क्रिकेट स्टिकर्स; या सोप्या '6' स्टेप्सने करा डाऊनलोड

लोकांचा आयपीएलचा उत्साह लक्षात घेऊनच व्हॉट्सअॅपने अॅनरॉईड मोबाईल युजर्ससाठी खास स्टिकर्स सादर केले आहेत.

WhatsApp (Photo Credits: Pixabay)

सध्या इंडियन प्रिमियर लीगची देशभरात धूम आहे. लोकांचा आयपीएलचा उत्साह लक्षात घेऊनच व्हॉट्सअॅपने अॅनरॉईड मोबाईल युजर्ससाठी खास स्टिकर्स सादर केले आहेत. नव्या स्टिकर्सचा पॅक प्रथम अॅनरॉईड युजर्ससाठी आणि नंतर iOS डिव्हाईसेससाठी उपलब्ध होईल. यापूर्वी देखील व्हॉट्सअॅपने अनेकदा विशेष दिवसांसाठी, सणावारानिमित्त स्टिकर्स सादर केले होते. आता देशभरातील आयपीएलचा फिव्हर पाहून नवे स्टिकर्स सादर करण्यात आले आहेत. एकदा तुम्ही हे आयपीएलचे नवे स्टिकर्स स्टोअरवरुन डाऊनलोड केल्यानंतर ते दुसऱ्या स्टिकर्स पॅक्सच्या उजव्या बाजूला असलेल्या इमोजी पॅनलमध्ये उपलब्ध होतील. (आताच काढून ठेवा, Whatsapp स्क्रिन शॉट घेणे लवकरच होणार बंद!)

आयपीएल स्टीकर्स डाऊनलोड, इन्स्टॉल आणि वापरण्याच्या सोप्या स्टेप्स:

1. प्रथम व्हॉट्सअॅप चॅटमध्ये जा. तेथे इमोजी आयकॉनवर क्लिक करा. इमोजी आयकॉन डाव्या बाजूला असेल. त्यानंतर स्टिकर आयकॉनवर क्लिक करा.

2. नंतर स्टिकर्सपुढे असणाऱ्या '+' या आयकॉनवर क्लिक करा.

3. स्टिकर लिस्ट येईल. तुम्ही नवे स्टिकर्स 'My Stickers' लिस्टमध्ये अॅड करु शकता. काही वेळेस नवे स्टिकर्स लिस्टमध्ये नसण्याची शक्यता आहे. असे झाल्यास Get more stickers ऑप्शन्सवर क्लिक करा. हा ऑप्शन लिस्टच्या शेवटी उपलब्ध असेल.

4. त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर पोहचाल. तेथे तुम्हाला क्रिकेटचे अनेक स्टीकर्स उपलब्ध होतील. तेथून तुम्ही अधिक स्टीकर्स डाऊनलोड करु शकता.

5. नवे स्टीकर्स डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला विविध स्टिकर्स पॅक्स उपलब्ध होतील.

6. नवे स्टिकर्स अॅड करण्यासाठी “+” आयकॉनवर क्लिक करा आणि पुन्हा व्हॉट्सअॅप इमोजी पॅनलमध्ये या. अॅड झालेले नवे स्टिकर्स तुम्हाला तेथे दिसतील.

व्हॉट्सअॅपवर स्टिकर्सचे हे नवे फिचर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सादर करण्यात आले. या स्टीकर्समुळे चॅट करत असताना तुमचे विचार, प्रतिक्रीया अधिक प्रभावीपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत तुम्ही पोहचवू शकता.