WhatsApp चं Message Yourself feature आता Windows Beta users साठी उपलब्ध; पहा कसा वापराल हे फीचर
तसेच डेस्कटॉप युजर्स ज्यांनी WhatsApp beta for Windows 2.2248.2.0 update घेतलं आहे त्यांच्यासाठी देखील खुलं झालं आहे.
Meta च्या मालकीचं मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp कडून आता Message Yourself feature जारी करण्यात आलं आहे. Message Yourself feature हे वाचून कदाचित तुम्हांला हे इंट्रोवर्ट लोकांसाठी आहे की काय असं तुम्हांला वाटू शकतं पण हे फीचर नोट्स, रिमाईंडर्स ठेवण्यासाठी मदत करणार आहे. waBetaInfo च्या माहितीनुसार, Windows Beta युजर्ससाठी आता हे नवं फीचर खुलं झालं आहे. तसेच डेस्कटॉप युजर्स ज्यांनी WhatsApp beta for Windows 2.2248.2.0 update घेतलं आहे त्यांच्यासाठी देखील खुलं झालं आहे. येत्या काही दिवसात हे अन्य लोकांनाही खुलं केलं जाणार आहे.
सध्या मोबाईल युजर्सना काही ट्रिक्सनेच हे फीचर वापरावं लागत आहे. सध्या, त्यांना स्वतःला संदेश पाठवण्यासाठी wa.me/+91 आणि त्यानंतर त्यांचा 10-अंकी मोबाइल नंबर वापरावा लागत आहे. व्हॉट्सअॅप डेस्कटॉप युजर्सना त्यांच्या कम्प्युटर/लॅपटॉपवर विंडोज 2.2248.2.0 अपडेटवर बीटा व्हर्जन सेट करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट स्टोअरमध्ये जावं लागेल. अपडेट डाउनलोड केल्यानंतर, त्यांना सेलमध्ये एक आयकॉन दिसेल जो त्यांच्या वैयक्तिक चॅटसाठी वापरता येईल. प्रत्येक वेळी युजर्स त्यांच्या स्वतःच्या फोन नंबरसह चॅटवर संदेश पाठवतात, तेव्हा संदेश सर्व लिंक केलेल्या डिव्हाइसेसवर पाठवला जाईल जेणेकरून ते प्रत्येकवेळेस उपलब्ध असतील. या चॅटवर पाठवलेले मेसेज व्हॉट्सअॅपवरील इतर मेसेजप्रमाणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतील. नक्की वाचा: WhatsApp 3D Avatar Launch: आता WhatsApp वर तयार करू शकता 3D Avatar, जाणून घ्या नवीन अपडेट विषयी सविस्तर .
व्हॉट्सअॅपच्या Message Yourself feature चा वापर सुरू करण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्स अॅप अपडेट करणे आवश्यक आहे. त्यासाठी, ते Google Play Store/Apple App Store वर जाऊ शकतात आणि अॅप अपडेट करू शकतात.त्यानंतर खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
- WhatsApp ओपन करा.
- नवीन चॅट बटणावर टॅप करा - iPhone वर उजव्या कोपर्यात आणि Android फोनवर खालच्या बाजूला हे दिसेल.
- इथे तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकासह 'Message Yourself' सह कॉन्टॅक्ट कार्ड दिसेल.
- कॉन्टॅक्ट वर क्लिक करा आणि स्वतःला मेसेज करू शकाल.
व्हॉट्सअॅपच्या माहितीनुसार,मेसेज युवरसेल्फ फीचरमुळे यूजर्स स्वतःला मेसेजसह फोटो, ऑडिओ, व्हिडिओ पाठवू शकतील. ते त्यांच्या स्मार्टफोनवरून थेट documents and media शेअर करू शकतात.