WhatsApp कडून एकावेळी Group Voice Call मध्ये 32 जण होऊ शकतात सहभागी, File Sharing क्षमता 2GB
व्हॉट्सअॅपच्या ग्रुप व्हॉईस कॉल (Group Voice Call) मधील सहभागी लोकांची संख्या 32 करण्यात आलीआहे तर शेअरिंग फाईल्सची क्षमता 2 गिगाबाईट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
जगभर लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp), वेळोवेळी त्यांच्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी लहान मोठे अपडेट्स करत असतात. आता नुकत्याच अजून एक महत्त्वाच्या अपडेटची घोषणा करण्यात आली आहे. आत व्हॉट्सअॅपच्या ग्रुप व्हॉईस कॉल (Group Voice Call) मधील सहभागी लोकांची संख्या 32 करण्यात आलीआहे तर शेअरिंग फाईल्सची क्षमता 2 गिगाबाईट पर्यंत वाढवण्यात आली आहे. सध्या व्हाईस कॉल (Voice Call) मध्ये एकावेळी केवळ 8 जण सहभागी होऊ शकतात. तर युजर्स एकमेकांना फाईल शेअर करताना त्याची मार्यादा 1 जीबी होती. त्यापेक्षा अधिक क्षमतेची फाइल शेअर केली जाऊ शकत नाही.
आता व्हॉट्सअॅप चॅटग्रुपच्या अॅडमिनला केव्हाही मेसेज डिलिट करून टाकण्याचा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे आता डिलिट केलेला मेसेज ग्रुप मध्ये कोणत्याच व्यक्तीला दिसणार नाही. आता व्हॉट्सॅप कम्युनिटीज देखील अधिक सुलभ केल्या जाणार आहेत ज्यामुळे सारे चॅट संघटित करणं आणि माहिती शोधणं सोप्पं होईल. एका कम्युनिटी अनेक ग्रुप एकत्र देखील आणता येणार आहे. हे देखील नक्की वाचा: WhatsApp Tips And Tricks: व्हॉट्सअॅपवर तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर, अशा प्रकारे करा स्वतःला अनब्लॉक; जाणून घ्या 'या' सोप्या ट्रिक .
व्हॉटसअॅपचे मालक Mark Zuckerberg यांनी शेअर केलेल्या ब्लॉग पोस्ट मध्ये आता व्हॉट्सअॅप वरही रिअॅक्शन बटण मिळेल, लार्ज फाईल शेअर करता येतील आणि ग्रुप कॉलची साईज वाढवली जाईल असं सांगण्यात आलं आहे. वन टॅप व्हॉईस कॉलिंग द्वारा 32 जण बोलू शकतील असं नवं डिझाईन येत असल्याची अधिकृत माहितीही देण्यात आली आहे. नक्की वाचा: गूगल असिस्टंटच्या मदतीने करता येणार WhatsApp Video आणि Audio कॉल .
व्हॉट्सअॅप कडून हळूहळू हे नवे फीचर्स रोल आऊट केले जाणार आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये आता घर, शाळा, निवासी संस्था, मित्र मंडळी यांचे ग्रुप्स कम्युनिटीमध्ये नीट संघटित करता येणार आहेत. अॅडमिन साठी देखील काही खास ऑप्शन्स असतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)