Whats App: ग्रुप अॅडमिन करु शकणार ग्रुपवरील कुठलाही आणि कुणाचाही मेसेज डिलीट, व्हॉट्स अॅपचं नवीन फिचर
व्हॉट्स अॅपच्या या नव्या फिचर बद्दलची माहिती वेबीटाइनफो कडून जारी करण्यात आली आहे.
जगभरात व्हॉट्स अॅप (Whats App) वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. व्हॉट्स अॅप कायमच आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फिचर (Feature) घेवून येताना दिसतो. पण यावेळी व्हॉट्स अॅप त्याच्यावरील ग्रुपबाबत (Whats App Group) एक भन्नाट फिचर घेवून आलं आहे. या फिचरनुसार आता व्हॉट्स अॅप ग्रुपच्या अॅडमिनला (Whats App Admin) एक विशेष हक्क मिळणार आहे. आता पर्यत ग्रुप अॅडमिनवर व्हायरल होणारे अनेक मिम (Meme), जोक्स (Jokes) तुम्ही बघितले असेल पण आता खरंच व्हॉट्स अप ग्रुप अडमिनला व्हॉट्स अॅपने काही महत्वाचे अधिकार देवू केले आहेत. तर तुम्ही देखील कुठल्या व्हॉट्स अॅप ग्रुपचे अडमिन असाल तर तुमच्या व्हॉट्स अॅपवर हे नवं फिचर सुरु झालं आहे का लगेच तपासून बघा.
व्हॉट्स अॅप घेवून आलेल्या या नव्या फिचरनुसार आता ग्रुप अॅडमिन त्याला वाटेल तेव्हा आणि वाटेल तो ग्रुपवरील मेसेज डिलीट (Message Delete) करु शकतो. व्हॉट्स अॅपच्या या नव्या फिचर बद्दलची माहिती वेबीटाइनफो (WABetaInfo) कडून जारी करण्यात आली आहे. पण सध्या तरी ही सुविधा फक्त काही बीटा टेस्टरसाठीचं (Beta Tester) उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे व्हॉट्स अॅपच्या प्रत्येक वापरकर्त्याला ही सुविधा वापरता येवू शकेल की नाही हे सांगता येणार नाही. पण तुम्ही कुठल्या ग्रुपचे अॅडमिन असल्यास तुम्ही लगेच तुमच व्हॉट्स अॅप सुरु करुन हे फिचर अॅक्टीव्हेट झालं आहे की नाही हे चेक करु शकता. (हे ही वाचा:- Har Ghar Tiranga: Social Media च्या Profile Picture वर तिरंगा ठेवण्याचं पंतप्रधान मोदींच आवहान, Whats App, Facebook, Instagram सह Twitter चा 'असा' बदला प्रोफाईल पिक्चर)
या फिचर नुसार तुम्ही अॅडमिन असलेल्या ग्रुपमध्ये उघडा आणि कुणाच्याही मेसेजवर लॉन्ग प्रेस (long Press) करा वरती तुम्हाला डिलीटचा ऑप्शन (Option) दिसल्यास किंवा त्या डिलीटच्या ऑप्शनवर क्लीक केल्यास डिलीट ऑल (Delete All) हा ऑप्शन दिसल्यास तुम्ही या सुविधेचा लाभ घेवू शकता येणारे बीटा युजर (Beta User) आहात असं समजा. तसेच व्हॉट्स अॅपच्या या नव्या फिचरचा वापर करायला सुरुवात करा.