What's App घेवून येणार पुन्हा एक नवा अपडेट, जाणून घ्या या अनोख्या अपडेटबाबत सविस्तर माहिती
तरी या फिचरचा नेमचा व्हॉट्स अप वापरकर्त्याला काय उपयोग होणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
WhatsApp, जगातील सर्वाधिक वापरणाऱ्या जाणाऱ्या सोशल मिडीया (Social Media) मोबाईल अॅपपैकी (Mobile Application) एक आहे. तरी व्हॉट्स अॅप आपल्या अॅनरॉइड (Android) वापरकर्त्यांसाठी एक नवीन अपडेट (Update) घेवून येत असल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी व्हॉट्सअप (Whats App) सध्या अॅपलीकेशन प्रोग्राम इंटरफेसवर काम करत आहे. व्हॉट्स अॅप नव्याने घेवून असलेल्या या अपडेटचं नाव 'डू नॉट डिस्टर्ब' (Do Not Disturb) मोड असं असणार आहे. तरी या फिचरचा नेमचा व्हॉट्स अप वापरकर्त्याला (What's App User) काय उपयोग होणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर या नवा अपडेट व्हॉट्स अप कॉल (What's App Call) संबंधी असणार आहे. जर तुम्हाला कुणाचा व्हॉट्सअप कॉल येवून गेला आणि तो कॉल तुमच्या कडून मीस झाल्यास तुम्हाला त्या मिसकॉलची नोटिफिकेशन (miss Call Notification) दिसणार आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला कॉल केला त्याच्या चॅटमध्ये तसेच कॉल हिस्टरीमध्ये तुम्हाला हा मिसकॉल दिसणार आहे. डू नॉट डिस्टर्ब API - मिस्ड कॉल्स' असे या फीचरचे नाव आहे.
एवढंच नाही तर जेव्हा तुम्ही 'डू नॉट डिस्टर्ब' मोडवर (Do Not Disturb Mode) असाल आणि तुम्ही कुठला कॉल (Call) मिस (Miss) केल्यास तो कॉल तुम्ही का मिस केलात ह्याचं कारण देखील या नवीन अपडेटनुसार (Update) हायलाइट (Highlight) करण्यात येणार आहे. तसेच तुम्ही ही नोटिफिकेशन बघितली हे फक्त तुम्हाला कळेल ते रिसीव्हरला (Receiver) कळणार नाही. (हे ही वाचा:- Amazon Great Indian Festival Sale: अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीव्हल सेलला आजपासून सुरुवात, मिळवा 70 टक्क्यांपर्यत सुट)
अजून तरी ही अपडेट (Update) कुठल्याही अनरॉइड फोनवर (Android Mobile) लॉंच (Launch) करण्यात आलेलं नाही पण लवकरच व्हॉट्स अॅप (What's App) आपल्या वापरकर्त्यांसाठी हा नवीन अपडेट (Update) घेवून येणार आहे. तरी व्हॉट्सअपच्या (What's App) या नव्या अपडेटसाठी अजून काही महिने वाट बघावी लागणार आहे. कारण सध्या या अपडेटवर काम सुरु आहे. व्हॉट्सअॅप (What's App) कायमच आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन अपडेट (Update) घेवून येताना दिसतो. जगभरात (World Wide) व्हॉट्स अॅप वापरणाऱ्यांची (Users) संख्या मोठी आहे.