Twitter On iPhone: अॅप स्टोअरवरुन ट्विटर गायब होणार? एलॉन मस्क यांचं खळबळजनक ट्विट

ट्विटर अॅप आता अपल मोबाईलच्या अप स्टोअरवरुन गायब होणार असल्याची शक्यता एल़ॉन मस्क यांनी दर्शवली आहे.

Twitter | Representational Image (Photo Credits: Pixabay)

ट्विटर (Twitter) आणि ट्विटर मधील १९० अंशाचे होणारे बदल यांत काही नाविन्यचं उरलेलं नाही. ट्विटर एल़न मस्कच्या मालकिचं झाल्यापासून रोज ट्विटरबाबत काहीतरी नवीन बातमी ऐकायला मिळते. पण आता तुम्हाला तुमच्या फोनमध्ये ट्विटर इंस्टालचं (Twitter Install) नाही करता आलं तर तुम्ही ट्विटर वापरणार कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत ट्विट करत खुद्द एलॉन मस्क यांनी माहिती दिली आहे. ट्विटर अॅप आता अपल मोबाईलच्या अप स्टोअरवरुन गायब होणार असल्याची शक्यता एल़ॉन मस्क यांनी दर्शवली आहे. तसेच अन्ड्रॉइड फोनच्या प्ले स्टोअरवरुन देखील ट्विटर हटवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ट्विटर (Twitter) हे सोशल मिडीया अॅप अँड्रॉइड मोबाईच्या (Android Mobile) प्ले स्टोअर (Play Store) तसेच अॅपलच्या आयओएस स्टोरवर उपलब्ध नसेल अशी चाहूल लागताचं काही दिवसांपूर्वीच एलॉन मस्क (Elon Musk) यांनी स्मार्टफोन उत्पादनाच्या रेसमधये येण्याचा इशारा दिला होता.

 

पण याबाबत आता एलॉन मस्क (Elon Musk) यांनी पुन्हा एकदा ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. किंबहुना अॅपलने ट्विटर (Apple Twitter) थेट अॅपल स्टोरवरुन (Apple Store) हटवण्याची धमकी दिल्याच्या आशयाचं ट्विट एलॉन मस्क (Elon Musk) यांनी दिल आहे. जर अपल स्टोअर किंवा प्लेस्टोअर वरुन खरचं ट्विटर अप हटवण्यात आलं तर एलॉन मस्क ह्याची कशी दखल घेणार याबाबत टेक्नोलॉजिकल विश्वात चर्चा सुरु आहे. तरी एलॉन मस्क स्वतचा स्मार्ट फोन लॉंच करण्याच्या तयारीत आहे. जो फोन आयफोन आणि अन्ड्रॉइड फोनला (Android) टक्कर देईल. (हे ही वाचा:- Elon Musk: अॅपल अँड्रॉइड फोनला टक्कर देण्यास एलॉन मस्क सज्ज, लवकरच लॉंच करणार ब्राण्ड न्यू स्मार्टफोन?)

 

दरम्यान एलॉन मस्क यांनी अपल अप स्टोअरबाबत एक मोठा खुलासा केला आहे. अपल स्टोअर अॅप डेव्हलपरकडून ३०% अधिक कर घेतात. तसेच मस्क यांनी सांगितलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलेलं ट्विटर हे एकमेवर सोशल मिडीया अप आहे. जिकडे नेमक काय घडलं ही खरी माहिती प्राप्त होते. तरी एलॉन मस्क येणाऱ्या दिवसात ट्विटर संबंधीत आणखी काय मोठा निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.