Kangana Ranaut वर Twitter कडून कारवाई, नियमांचं उल्लंघन केल्याचं सांगत हटवली काही ट्वीट्स

कंगनाने आंदोलक शेतकर्‍यांचा उल्लेख 'दहशतवादी' असा केला होता तर पॉप स्टार रिहानाला 'Fool' अर्थात मूर्ख म्हणत प्रतिक्रिया दिली होती. देशातील जे खेळाडू भारताच्या सार्वभौमत्त्वाबाबत ट्वीट करत त्यांच्यावरही कंगनाने तिखट शब्दांत ट्वीटर वर प्रतिक्रिया दिली आहे.

Kangana Ranaut | (Photo Credits-Twitter Video)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut हीचे काही ट्वीट्स मायक्रोब्लॉगिंग साईट ट्वीटर (Twitter) कडून काढून टाकण्यात आले आहे. दरम्यान ट्वीटरने याबाबात माहिती देताना कंगनाचे काही ट्वीट्स हे साईट्सच्या नियमांचे उल्लंघन करणारे होते असे सांगत त्याच्यावर कारवाई करत काढून टाकण्यात आल्याचे एका पत्रकातून स्पष्ट केले आहे. दरम्यान ट्वीटरने कारवाई केल्यानंतर कंगनाच्या प्रोफाईल मध्ये काही ट्वीटच्या खाली no longer available असा मेसेज दिसत आहे. त्याच्या पुढेच ट्वीटरने त्यांची नियमावली देखील जोडली आहे.

सध्या दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणि त्याला देशा-परदेशातून मिळत असलेल्या सेलिब्रिटींचा प्रतिसाद यावरून कंगनाने काही ट्वीट्स केली होती. यामध्ये पॉप स्टार रिहाना चा देखील समावेश होता. दरम्यान रिहानाने काल शेतकरी आंदोलनाबाबत आपण काही बोलत का नाही? असा प्रश्न विचारत सीएनएन चं एक आर्टिकल रिट्वीट करत कोट केले होते. त्यावर कंगनाने रिहाना खडे बोल सुनावले होते. दरम्यान त्यानंतर काही सेलिब्रिटींनी, खेळाडूंनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र त्यामधील शब्दांचा वापर पाहता ट्वीटरने कंगनाचे काही ट्वीट्स हटवले आहेत.

ANI Tweet

ट्वीटरने हटवली कंगनाची ट्वीट्स

Kangana Tweets | Photo Credits: Twitter/ Kangana Rannut

काही दिवसांपूर्वी पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांज ला देखील 'खलिस्तानी' म्हटलं होतं. मात्र कालच त्याने यापुढे तुझ्या ट्वीट्ला उत्तर देणार नसल्याचं म्हटलं आहे. मंगळवारी कंगनाने आंदोलक शेतकर्‍यांचा उल्लेख 'दहशतवादी' असा केला होता तर पॉप स्टार रिहानाला 'Fool' अर्थात मूर्ख म्हणत प्रतिक्रिया दिली होती. देशातील जे खेळाडू भारताच्या सार्वभौमत्त्वाबाबत ट्वीट करत त्यांच्यावरही कंगनाने तिखट शब्दांत ट्वीटर वर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान यापूर्वी देखील सुशांतसिंह राजपूत प्रकरण आणि शिवसेना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रतिक्रिया देताना कंगनाचा तोल गेला होता. त्यावेळेसही कंगनावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सोबतही कंगनाचं ट्वीटर वॉर  सुरू होतं.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement