Twitter: केवळ 6 महिन्यात ट्वीटरकडून 1 हजाराहून अधिक URL ब्लॉक

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्वीटरने जानेवारी 2022 ते जून 2022 या सहा महिन्यांच्या कालवधीत 1122 URL ब्लॉक केल्या आहेत.

Twitter logo (Photo courtesy: Twitter)

मायक्रोब्लॉगिंग साइट (Micro Blogging Site) ट्वीटर (Twitter) वापरणाऱ्यांची संख्या भारतता मोठी आहे. अगदीचं राजकीय नेत्यांपासून (Politician), सिने अभिनेते (Bollywood Celebrities) ते सर्वसामान्य माणसापर्यत सगळेच ट्वीटर वापरतात. हल्ली काही मोठी घोषणा करायची असल्यास सरकार (Government) फक्त जीआर (Government Rule) काढत नाहीत तर झालेले बदल किंवा कोणतीही मोठी घोषणा ट्वीटरच्या माध्यमातून करताना दिसतात. तसेच बॉलिवुड अभिनेते देखील त्यांच्या सिनेमांचं प्रमोशन (Movie Promotion), वैयक्तीक (Personal) सह व्यवयायिक (Professional) आयुष्यातील अपडेट (Update) ट्वीटरच्या माध्ययमातून देतात. सामान्य माणूस देखील ट्वीटरच्या माध्यमातून सहज व्यक्त होवू शकतो पण याचं ट्वीटर कडून URL संबंधीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ट्विटरने केवळ सहा महिन्यात म्हणजे जानेवारी (January) 2022 ते जून (June) 2022 या दरम्यान 1,122 URL ब्लॉक (Block) केल्या आहेत.

 

भारतीय आयटी मंत्रालयाच्या (IT Ministry) सुचनेनुसार मायक्रोब्लॉगिंग साइट ट्वीटरने जानेवारी 2022 ते जून 2022 या सहा महिन्यांच्या कालवधीत 1122 URL ब्लॉक केल्या आहेत. संबंधीत माहिती लोकसभेत (Loksabha) एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrashekhar) यांनी दिली. दर वर्षीच सरकारच्या सुचनेनुसार काही URL ब्लॉक (Block) करण्यात येतात. 2018 मध्ये ब्लॉक करण्यात आलेल्या URL ची संख्या 225, 2019 मध्ये 1,041 तर 2021 मध्ये 2,851 URL ब्लॉक करण्यात आल्यात. यावर्षी म्हणजे 2022 मध्ये ब्लॉक URL ची संख्या हजारापार असली तर मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. (हे ही वाचा:- PUBG पाठोपाठ BGMI ही भारतात बॅन? नेटकरी संभ्रमात Social Media वर भन्नाट Memes व्हायरल)

 

माहिती तंत्रज्ञान (IT) कायदा, 2000 चे कलम 69A नुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला अशा प्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, भारताचे संरक्षण, राज्याची सुरक्षा, मित्रत्वाच्या हितासाठी कोणत्याही संगणकातील माहिती ब्लॉक करणे असे बदल सरकार करु शकते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now