'Family Safety Mode' या नव्या फिचरसह आता मुलांच्या TikTok अकाऊंट राहणार पालकांचा कंट्रोल
Tik Tok video app (Photo credit: Wiki Commons)

शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग अॅप Tik Tok ची सध्या प्रचंड क्रेझ आहे. फक्त तरुणाईचं नाही तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच Tik Tok ने वेड लावले आहे. सामान्यांसोबतच सेलिब्रेटींनाही Tik Tok ची चांगलीच भूरळ पडली आहे. मात्र लहान मुलांकडून अॅपचा वाढता वापर बघता त्यावर पालकांचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेत टिकटॉकने नवे सेफ्टी फिचर लॉन्च केले आहे. 'फॅमेली सेफ्टी मोड' (Family Safety Mode) असे या फिचरचे नाव असून यामुळे मुलांच्या टिकटॉक व्हिडिओवर पालक लक्ष ठेवू शकतील. या फिचरमुळे पालकांना मुलांचं अकाऊंट आपल्या अकाऊंटसोबत लिंक करता येईल. (पंजाब: Tik Tok स्टार बनण्याची इच्छा असणाऱ्या दहा वर्षीय मुलीने फाशी लावत केली आत्महत्या)

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, टिकटॉकची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याने युजर्संना अॅप सुरक्षित वाटावे यासाठी नवनवे फिचर्स सादर केले जात आहेत. Family Safety Mode या नव्या फिचरमुळे पालकांना आपल्या मुलाचे TikTok अकाऊंट कंट्रोल करता येईल आणि त्यावर लक्षही ठेवता येईल. तसंच युजर्स टिकटॉकवरुन ब्रेक घेण्यासाठी ते किती वेळ अॅपवर घालवातात याचीही माहिती त्यांना मिळावी यासाठी आम्ही screen time management सह सेफ्टी व्हिडिओजची मालिका काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तुरुंगात Tik Tok चा व्हिडिओ शूट करणे महिला पोलिसाला पडले महागात, गमावली नोकरी (Watch Video)

सर्व प्रथम Family Safety Mode हे नवे फिचर UK मध्ये लॉन्च करण्यात येईल. त्यानंतर इतर देशातील युजर्संना याचा लाभ घेता येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.