Realme GT लवकरच होणार भारतात लाँच, ट्विटद्वारे कंपनीने दिले 'हे' महत्त्वाचे संकेत
मात्र लवकरच रियलमी कंपनी भारतीय बाजारात धमाका करणार असल्याचे संकेत ट्विटद्वारे देण्यात आले आहे.
स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme लवकरच भारतात आपला एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. Realme GT हे या स्मार्टफोनचे नाव असून कंपनीने याबाबत ट्विटद्वारे माहिती देऊन हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्याचे संकेत दिले आहे. हा स्मार्टफोन मार्चमध्ये चीनमध्ये लाँच झाला आहे. त्यामुळे या स्मार्टफोनबाबत लोकांमध्ये उत्सुकता प्रचंड वाढलीय. या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अजून कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Realme GT भारतात नेमका कधी लाँच होणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच रियलमी कंपनी भारतीय बाजारात धमाका करणार असल्याचे संकेत ट्विटद्वारे देण्यात आले आहे.हेदेखील वाचा- Amazon Prime चा 'हा' सर्वात स्वस्त सब्सक्रिप्शन प्लॅन बंद, RBI चा नवा नियम ठरले कारण
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये 5.43 इंचाची सुपर अमोल्ड डिस्प्ले, फिंगरप्रिंट सेंसर, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट असू शकतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची बॅटरी असू शकते.
Realme GT च्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमे-याचा समावेश आहे. त्याचबरोबर यात सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा असू शकतो.
Realme GT स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. हा स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटी सपोर्टसह येतो. काही दिवसांपूर्वी भारतात Realme 8 5G स्मार्टफोन नव्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंटमध्ये लॉन्च केला आहे. याची किंमत 13,999 रुपये आहे. रिअलमी 8 5जी चा बेस वेरियंट भारतात येणारा सर्वाधिक स्वस्त 5जी स्मार्टफोन असणार आहे.