Starliner Capsule Leaves Space Station: बोइंग स्टारलाइनर अंतराळयान पृथ्वीवर परतले, पहा व्हिडिओ
प्रवेश केल्यानंतर त्याचा वेग ताशी 2,735 किमी इतका होता.
Starliner Capsule Leaves Space Station: जूनच्या पहिल्या आठवड्यात नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विल्मोर (Butch Wilmore) यांना बोईंग स्टारलाइनर (Boeing Starliner) अंतराळयान अंतराळात घेऊन गेले होते. यानंतर तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर परत येऊ शकले नाहीत. आता हे यान क्रूशिवाय पृथ्वीवर परतले आहे. आज सकाळी 12:01 वाजता स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट न्यू मेक्सिकोमधील व्हाईट सँड्स स्पेस हार्बर येथे लँड झाले. लँडिंगच्या अर्धा तास आधी नासाने याचे थेट प्रक्षेपण दाखवले. जे NASA+, NASA ॲप, YouTube किंवा एजन्सीच्या वेबसाइटवर पाहिले जाऊ शकते.
दरम्यान, नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पृथ्वीवर परतणार आहेत. त्याच वेळी, स्टारलाइनरने 6 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातून उड्डाण घेतले होते. अखेर आज सकाळी ते पृथ्वीवर पोहोचले. या मोहिमेवर जगभरातील शास्त्रज्ञांच्या नजरा खिळल्या आहेत. (हेही वाचा - Sunita Williams आणि Butch Wilmore यांचा अंतराळातला मुक्काम फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढला; SpaceX च्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टन परतणार,NASA ने दिली माहिती)
विल्यम्सला घेऊन जाणारे बोईंग स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट पृथ्वीवर परतले, पहा व्हिडिओ -
नासाच्या वेबसाइटनुसार, स्टारलाइनर (स्पेस क्राफ्ट) सकाळी 9.15 वाजता पृथ्वीच्या वातावरणात दाखल झाले होते. प्रवेश केल्यानंतर त्याचा वेग ताशी 2,735 किमी इतका होता. लँडिंगच्या अवघ्या 3 मिनिटांपूर्वी, अंतराळ यानाचे 3 पॅराशूट उघडले. बोईंग कंपनीने नासाच्या सहकार्याने हे अंतराळ यान तयार केले आहे. 5 जून रोजी सुनीता आणि बुच यांना ISS मध्ये पाठवण्यात आले. ते फक्त 8 दिवसांचे मिशन होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे त्याचे परतणे पुढे ढकलावे लागले. आता हे यान क्रूशिवाय पृथ्वीवर परतले. स्टारलाइनरच्या लँडिंगनंतर, नासा आणि बोईंगची टीम ते परत असेंब्ली युनिटमध्ये घेऊन जाईल. तेथे त्याची तपासणी केली जाईल. स्टारलाइनची प्रोपल्शन प्रणाली का बिघडली याचा शोध घेण्यात येणार आहे.
क्रू फ्लाइट टेस्ट मिशन -
5 जून 2024 रोजी सुनीता स्टारलाइनर नावाच्या अंतराळ यानात अंतराळ मोहिमेवर गेली. हे अमेरिकन विमान कंपनी बोइंग आणि नासा यांचे संयुक्त 'क्रू फ्लाइट टेस्ट मिशन' आहे. यामध्ये सुनीता या यानाची पायलट होती. त्यांच्यासोबत आलेले बुश विल्मोर हे या मिशनचे कमांडर होते. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) 8 दिवस राहून दोघेही पृथ्वीवर परतणार होते, मात्र अंतराळ यानात तांत्रिक बिघाड आणि हेलियम वायूची गळती यामुळे सुनीता आणि बुश विल्मोर तिथेच अडकले आहेत.