Foxconn Invest 1200 Crores In India: फॉक्सकॉन करणार भारतात मोठी गुंतवणूक, एचसीएल समूहासोबत केला करार
आता फॉक्सकॉनने देशातील सर्वात मोठ्या HCL कंपनीशी हातमिळवणी केली आहे.
तैवानच्या (Taiwan) इलेक्ट्रॉनिक्स कंपनी फॉक्सकॉनने (Foxconn) भारतात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीनं भारतीय कंपनी एचसीएल समूहासोबत (HCL Group) करार केला आहे. एचसीएल समूहासोबत भागीदारीत भारतात चिप असेंब्ली आणि टेस्टिंग प्लांट तयार करण्यासाठी लिलाव होणार आहे. त्यामुळं तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीने या प्रकल्पासाठी 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तैवानची सर्वात मोठी कंपनी फॉक्सकॉन भारतात गुंतवणूकीसाठी उत्सुक आहे. (हेही वाचा - Foxconn: वेदांताशी विभक्त झाल्यावर फॉक्सकॉन कंपनी भारतात चीप बनवण्यासाठी अर्ज करणार)
ॲपलची सर्वात मोठी उत्पादक फॉक्सकॉन भारतात अधिक मजबूतपणे आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी कंपनीने भारतात सेमीकंडक्टर व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. फॉक्सकॉनसोबत सेमीकंडक्टर चिप्सवर काम करेल. फॉक्सकॉननेही आपला कारखाना सुरू करण्यासाठी 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
फॉक्सकॉन कंपनीने आधी वेदांतसोबत भागीदारी केली, पण नंतर फॉक्सकॉनला वेदांत सोडावे लागले. आता फॉक्सकॉनने देशातील सर्वात मोठ्या HCL कंपनीशी हातमिळवणी केली आहे. ही कंपनी आता फॉक्सकॉनसोबत सेमीकंडक्टर चिप्सवर काम करेल. आयफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सची जगातील सर्वात मोठी असेंबलर फॉक्सकॉन, भू-राजकीय तणावामुळे भारतात विस्तारत आहे. तसेच, चीनमध्ये सतत वाढत असलेल्या आर्थिक अनिश्चिततेमुळे काम करणे खूप कठीण झाले आहे.