दक्षिणायन व गुरु-शनीची युती होणार असल्याने गुगलचे स्पेशल Google Doodle

Winter Solstice 2020 and the Great Conjunction Google Doodle (Photo Credits: Google)

Winter Solstice Great Conjunction Google Doodle: आज अवकाशात दक्षिणायन व गुरु-शनीची महायुती पहायला मिळणार आहे. तर गुरु-शनी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून 0.1 अंशावर आलेले दिसून येणार आहेत. तब्बल 59 वर्षानंतर आता गुरु आणि शनी मकर राशीत एकत्रित येणार असल्याने ही एक खोलशास्रांसाठी महत्वाची गोष्ट असणार आहे. ही स्थिती येत्या 5 एप्रिल 2021 पर्यंत राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना अद्भूत असून जवळजवळ 800 वर्षांनी हा दुर्मिळ योग जुळून आला आहे. तर याच पार्श्वभुमीवर गुगल कडून दक्षिणायन व गुरु शनीची युती होणार असल्याने गुगलने एक स्पेशल डुडल साकारले आहे.

गुरु- शनीची महायुती ही याआधी 1226, 1663 मध्ये दिसून आली होती. त्यानंतर आता 2020 मध्ये हा योग पुन्हा आल्याने खगोल अभ्यासकांमध्ये उत्सुकता आहे. ही युती दुर्बिणीने पाहिल्यास ती तुम्हाला स्पष्टपणे दिसणार आहे. (Christmas Star: या महिन्यात तब्बल 800 वर्षानंतर आकाशात दिसणार मोठी खगोलशास्त्रीय घटना; दर्शन होणार 'ख्रिसमस स्टार'चे, जाणून घ्या सविस्तर)

Google Doodle

तर सुर्यमालिकेत गुरु आणि शनी पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचे ग्रह आहेत. या दोघांमधील अंतर पौर्णिमेला दिसणाऱ्या चंद्राच्या व्यासापेक्षा पाच पटीने कमी झालेले असणार आहे. या दोघांची युती उघड्या डोळ्यांनी ही पाहता येणार आहे. तर 31 मे 2020 मध्ये गुरु आणि शनी एकत्रित आल्याचे दिसून आले होते. याआधील 1632 मध्ये हे दोन्ही ग्रह 0.1 अंश ऐवढ्या जवळ आले होते. यापुढे आता 15 मार्च 2080 मध्ये असा योग असल्याचे सांगण्यात आले आहे.