Chandrayaan 2 : विक्रम लँडरबाबत आली मोठी बातमी, चांद्रयान 2 विषयी या महिन्यात काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता
कारण नासाचे लूनर रिकनँसेंस ऑर्बिटर पुन्हा एकदा व्रिकम लँडर ज्या भागात कोसळले तेथून जाणार आहे. त्यामुळे विक्रमचा शोध लागण्याच्या शक्यता अधिक बळावल्या आहेत.
चांद्रयान 2 विषयी काहीतरी बातमी मिळावी आणि त्याचा सुगावा लागावा यासाठी नासाकडूनही जोरदार प्रयत्न सुरु आहेत. अलीकडेच चांद्रमोहिमेतील चांद्रयान 2 (Chandrayaan 2) च्या ऑर्बिटरने चंद्राचे काही नवे फोटो पाठवले आहेत. Orbiter High Resolution Camera च्या माध्यमातून चंद्राचे हे खास फोटो टिपण्यात आले आहेत. त्यात आता नासाने विक्रम लँडरचा शोध लागण्याची नवी शक्यता वर्तवली आहे. कारण नासाचे लूनर रिकनँसेंस ऑर्बिटर पुन्हा एकदा व्रिकम लँडर ज्या भागात कोसळले तेथून जाणार आहे. त्यामुळे विक्रमचा शोध लागण्याच्या शक्यता अधिक बळावल्या आहेत.
याआधी 17 सप्टेंबरला एलआरओ विक्रम लँडर ज्या भागात कोसळले अशी शक्यता होती तेथून गेले होते आणि काही फोटोही घेतले होते. मात्र चंद्रावर अंधार पसरण्यास सुरुवात झालेली असल्याने फोटोमध्ये विक्रम लँडरचा पत्ता लागला नव्हता. मात्र आता एलआरओ ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा याच भागावर जाणार असून तेव्हा येथे लख्ख प्रकाश असणार आहे.
हेदेखील वाचा- चंद्रयान २: इस्त्रोच्या शास्त्रज्ञांसाठी कवी कुमार विश्वास यांनी लिहलेली कविता नक्की वाचा
यामुळे समस्त भारतीयांच्या भुवया उंचावल्या असून विक्रम लँडर बाबत सुवार्ता मिळेल अशी आशा आहे. OHRC instrument द्वारा चंद्राच्या पृष्ठभागाचा अगदी जवळून दृश्य पाहता येत आहे. चंद्रयान 2 पुढील साडेसात वर्षे चंद्राची परिक्रमा करत राहणार आहे.
7 सप्टेंबर 2019 दिवशी चंद्रयान 2 चे विक्रम लॅन्डर चंद्राच्या पृष्ठभागावर स्मूथ लॅन्डिंग करणं अपेक्षित होते मात्र विक्रम लॅन्डरचे हार्ड लॅन्डिंग झाल्याने त्याच्याशी संपर्क तुटला आहे. मात्र ऑर्बिटर अजूनही काम करत असल्याने त्याच्याद्वारा काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. काल (4 ऑक्टोबर) रात्री उशिरा इस्त्रोने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत.