UK: ब्रिटनमध्ये सापडले 110 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या Dinosaurs च्या सहा प्रजातींच्या पायांचे ठसे; 80 सेमी रूंद व 65 सेमी लांब

110 दशलक्ष वर्षांपूर्वी युकेच्या मातीवर चाललेले हे सर्वात शेवटचे डायनासोर होते. हेस्टिंग्ज संग्रहालय आणि आर्ट गॅलरीमधील क्यूरेटर आणि पोर्ट्समाउथ विद्यापीठातील वैज्ञानिक यांनी डायनासोरच्या पायाच्या ठसांचा शोध लावला आहे

dinosaurs (Photo credits: Pixabay.com)

ब्रिटनमधील (UK) संशोधकांच्या पथकाने डायनासोरच्या (Dinosaur) कमीतकमी सहा वेगवेगळ्या प्रजातींच्या पायाचे ठसे (Footprints) शोधले आहेत. 110 दशलक्ष वर्षांपूर्वी युकेच्या मातीवर चाललेले हे सर्वात शेवटचे डायनासोर होते. हेस्टिंग्ज संग्रहालय आणि आर्ट गॅलरीमधील क्यूरेटर आणि पोर्ट्समाउथ विद्यापीठातील वैज्ञानिक यांनी डायनासोरच्या पायाच्या ठसांचा शोध लावला आहे. हे डायनासोर ब्रिटनमधील नोंद असलेले शेवटचे डायनासोर आहेत. हे पावलांचे ठसे खडकावर आणि केंटच्या फॉकेस्टोनच्या किनाऱ्यावर सापडले आहे. याठिकाणी वादळयुक्त परिस्थितीमुळे खडक व किनाऱ्याच्या पाण्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तिथे सतत नवीन जीवाश्म समोर येत आहेत.

पॅलेबिओलॉजीचे प्रोफेसर डेव्हिड मार्टिल यांनी सांगितले की, यावेळी पहिल्यांदाच 'फोरकेस्टोन फॉरमेशन' म्हणून ओळखल्या खडकांच्या स्तरावर डायनासोरच्या पायांचे ठसे सापडले आहेत. हा एक विलक्षण शोध आहे कारण नामशेष होण्यापूर्वी देशात डायनासोर इतके भरकटत राहिले असावेत असे दिसून येते. सध्या व्हाईट क्लिफ्स ऑफ डोव्हर ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ते फिरत असावेत. हे पायांचे ठसे निरनिराळ्या डायनासोरचे आहेत जे दर्शविते की, 110 मिलियन वर्षांपूर्वी क्रेटासियस कालावधीच्या शेवटी दक्षिण इंग्लंडमध्ये डायनासोरमध्ये विविधता होती.

याआधी समोर आलेल्या बहुतेक शोधांमध्ये एखाद्या पायांचे ठसे होते, परंतु आता या एकाच शोधामध्ये सहा ठस्स्यांचा समावेश आहे. सर्वात मोठा पायाचा ठसा - 80 सेमी रूंद आणि 65 सेमी लांब आहे. त्याची ओळख इगुआनोडॉन सारखा डायनासोर म्हणून केली गेली आहे. (हेही वाचा: पृथ्वीवर येणार मंगळ ग्रहावरील माती; NASA खर्च करणार तब्बल 9 अब्ज डॉलर्स, सर्वात महागडी गोष्ट)

इगुआनोडन्स हे देखील वनस्पती खाणारे होते. ते 10 मीटरपर्यंत उंच होते. ते दोन्ही पायांवर किंवा सर्व चारही पायांवर चालत असत. हे डायनासोर कदाचित किनारपट्टीवर खाद्य शोधण्यासाठी आले असावेत किंवा त्यांनी स्थलांतरण केले असावे, असे मार्टिल यांनी सांगितले.