Surya Grahan June 2021 Live Stream: आजचं सूर्यग्रहण YouTube आणि Facebook वर कसं पहाल?

भारतात ते सर्वत्र दिसणार नसले तरीही ऑनलाईन त्याचा नजारा तुम्ही नक्कीच घेऊ शकता.

Photo Credit: Pixabay

आज यंदाच्या वर्षामधलं पहिलं सूर्यग्रहण आहे. शनी जयंती, भावुका अमावस्येला आलेलं हे सूर्य ग्रहण भारतामध्ये फारच थोड्या भागात आणि कमी वेळेसाठी दिसणार आहे. त्यामुळे खगोलीय घटनांचं कौतुक असणार्‍या अनेकांसाठी हा अवकाशीय नजारा थेट डोळ्यांनी पाहता येणार नसला तरीही आता सोशल मीडीयामुळे फेसबूक, युट्युब वर तुम्हांला हे सारं पाहता येणार आहे. आज जगात काही ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहण तर काही ठिकाणी आंशिक स्वरूपाचं सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे या नजार्‍याला अनुभवण्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर पहा भारतात घरबसल्या आजचं सूर्यग्रहण कसं बघाल? Surya Grahan 2021: शनि जयंतीच्या दिवशी 148 वर्षानंतर होणार सूर्यग्रहण; 'या' गोष्टी ग्रहण असताना चुकूनही करू नका .

जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधोमध येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. आज NASA ने दिलेल्या माहितीनुसार, सूर्यग्रहणातील आकर्षण म्हणजे Ring of Fire हे कॅनडा, ग्रीनलॅन्ड आणि उत्तर रशियाच्या काही भागातून दिसणार आहे. आज जेथे annular solar eclipse दिसणार नाही तेथील काही भागात आंशिक सूर्यग्रहण दिसेल.

फेसबूक, युट्युबच्या माध्यमातून सूर्यग्रहण कसं पहाल?

भारतीय वेळेनुसार, आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी या ग्रहणाला सुरूवात होणार आहे. अंदाजे 5 तास हे सूर्य ग्रहण चालणार आहे.

दरम्यान भारतामध्ये ग्रहणाशी निगडीत काही धार्मिक रूढी- परंपरा देखील आहेत. पण त्याला ठोस वैज्ञानिक पुरावा नाही त्यामुळे ग्रहणाविषयी तुमच्या मनात असलेले समज-गैरसमज दूर ठेवा आणि एक अवकाशीय घटना म्हणून ग्रहणादरम्यानचा अद्भूत नजारा नक्की पहा.