सूर्याचा पृष्ठभाग कसा दिसतो पाहिलात काय? पहिल्यांदाच स्पष्ट फोटो; जणू मधमाशीचे पोळेच

परंतू प्रत्यक्षात सूर्याच्या पृष्ठभागावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर महाकाय खड्डे पाहायला मिळतात. दरम्यान, सूर्याबद्धल मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु असून, लवकरच अधिकाधिक माहिती हाती येऊ शकेल असे, संशोधकांनी म्हटले आहे.

Sun's Surface | (Photo Credits: National Science Foundation)

सूर्य (Sun) आणि त्याची उर्जा यांबाबत आजवर आपण सर्वांनीच ऐकले अधिक आणि पाहिले कमी आहे. कारण, सूर्याकडे डोळे रोखून पाहणे हे मानसाचेच काय पृथ्वी तलाववरील कोणत्यात प्राण्याचे काम नव्हे. त्याला ते शक्यही नाही. त्यामुळे मानवाच्या मनात एक कुतूहल नेहमीच दाटले आहे. सूर्य नेमका कसा असे, त्याचे काम कसे चालत असेल. तो जवळून कसा दिसत असेल. वैगेरे वैगेरे.. पण मंडळी सूर्याबाबत एक महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच सूर्याचा पृष्ठभाग (Sun's Surface) स्पष्ट दाखवणारा फोटो मिळाला आहे. होय, हवाई येथील हवाई येथील राष्ट्रीय विज्ञान संस्था ( National Science Foundation, Hawaii) हे यश मिळवू शकली आहे. या संस्थेच्याडेनियल इनोये सोलर टेलिस्कोप ने टीपले आहेत. हा टेलिस्कोप जगातील सर्वात मोठा टेलीस्कोप म्हणून ओळखला जातो.

सूर्याच्या पृष्ठभागाचे फोटो संस्थेने आपल्या ट्विटर हँडलवरही प्रसारीत केले आहेत. हे फोटो पाहिल्यावर असे वाटते की आपण जणू मधमाशांचे पोळेच पाहात आहोत. दावा केला जात आहे की, सूर्याच्या पृष्ठभागाचे हे छायाचित्र तब्बल 30 किलोमीटर परिसराचे आहे. सूर्याचा पृष्ठभाग मधमाशीच्या पोळ्या प्रमाणे आहे. या पोळ्याला जसे खड्डे असतात तशाच पद्धतीचे हे खड्डे आहेत. विशेष म्हणजे एक खड्डा शेकडो किलोमीटर अंतर दूरवर पसरला आहे. इतका सूर्याच्या पृष्ठभागाचा एक खड्डा पृथ्वीवरील एका एका देशांपेक्षाही मोठा आहे. या खड्ड्यांमधूनच सूर्य उर्जा निर्माण होत असल्याचा संशोधकांचा प्राथमिक अंदाज आहे.

ट्विट

ट्विट

हा टेलिस्कोप पृथ्वीच्या स्केलच्या विरुद्ध सेट करण्यात आला आहे. ज्याचा व्यास सुमारे 1.4 मिलियन किमी आणि पृथ्वीपासून सुमारे 149 मिलियन किमी आहे. फोटोमध्ये सूर्याच्या पृष्ठभागाची रचना पाहायला मिळते. या पृष्ठभागावर उष्णता, गॅस आणि प्लाज्मा यांचे द्रव्यमान पाहायला मिळते. दरम्यान, टेलिस्कोपने एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यात 14 सेकंदाद सूर्याच्या पृष्ठभागावर एक टर्बुलेंस सौरपृष्ठीय हालचाल होते. हा व्हिडिओ सुमारे 200मिलियन वर्ग किलोमीट क्षत्रफळ व्यापतो असेही म्हटले आहे. (हेही वाचा, लाल धबधब्याचे गूढ)

व्हिडिओ

वैज्ञानिकांना अपेक्षीत होते की सूर्यावर अनेक बिंदूंचा समूच्चय पाहायला मिळेल. परंतू प्रत्यक्षात सूर्याच्या पृष्ठभागावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर महाकाय खड्डे पाहायला मिळतात. दरम्यान, सूर्याबद्धल मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु असून, लवकरच अधिकाधिक माहिती हाती येऊ शकेल असे, संशोधकांनी म्हटले आहे.