'इस्त्रो' आज करणार RISAT-2BR1 Satellite चं प्रक्षेपण; इथे पहा लाईव्ह स्ट्रीमिंग!
त्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग युट्युबवर पाहता येणार आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation) ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचे (पीएसएलव्ही सी 48) बुधवारी अर्धशतक साजरे होणार आहे. बुधवारच्या प्रक्षेपणामधून रडारचा समावेश असणाऱ्या 'रिसॅट 2 बीआर 1' (RISAT-2BR1) या भारतीय उपग्रहासह इस्रायल, इटली, जपान आणि अमेरिका या देशांच्या एकूण नऊ उपग्रहांनाही अवकाशात पाठवण्यात येईल. बुधवारी दुपारी तीन वाजून 25 मिनिटांनी श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून हे प्रक्षेपण होईल. त्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे.
'इस्त्रो' च्या PSLV C 48 द्वारा आज सॅटलाईट RISAT-2BR1चं प्रक्षेपण होणार आहे. इस्रायल, इटली, जपान,अमेरिका सोबत सुमारे 9 देशांचे उपग्रह आज (11 डिसेंबर) अवकाशात सोडले जाणार आहेत. दरम्यान श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून हे प्रक्षेपण होईल. काल याचे काऊंट डाऊन सुरू झाले असून आज दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी प्र्क्षेपण होणार आहे. आज 'पीएसएलव्ही'चे हे 50 वे उड्डाण आहे. ISRO च्या PSLV-C47 द्वारा लॉन्च झालं 'कार्टोसेट 3' इमेज सॅटेलाइट, सैन्यासाठी ठरेल अत्यंत फायदेशीर.
इथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग
पीएसएलव्ही याच्या 50व्या उड्डाणातून 628 किलो वजनाच्या रिसॅट 2 बीआर 1 उपग्रहाचे 576 किमी कक्षेत प्रक्षेपण करेल. तर कृषी, वन आणि आपत्ती व्यवस्थापनात या उपग्रहाचा फायदा होणार आहे. यामध्ये इस्त्राईल. इटली, जपानचे एक तर अमेरिकेचे 6 उपग्रह ध्रुवीय कक्षेमध्ये सोडले जाणार आहेत.