Chandrayaan 2 आज अवकाशात झेपावणार; दुपारी 2.43 मिनिटांनी होणार उड्डाण

जीएलएसव्ही मार्क 3 (GSLVMKIII) प्रक्षेपकाद्वारा श्रीहरीकोटा येथून चांद्रयान 2 चे प्रक्षेपण होणार आहे. या प्रक्षेपकाला 'बाहुबली' असं देखील संबोधलं जातं.

Chandrayaan-2 Launch (Photo Credits: Twitter, @isro)

भारताची दुसरी चांद्रमोहिम 'चांद्रयान 2' (Chandrayaan 2) आज (22 जुलै) अवकाशामध्ये झेपावणार आहे. चैन्नई नजिक असलेल्या सतीश धवन अवकाश केंद्राच्या (Satish Dhawan Space Centre) प्रक्षेपण तळावरून आज दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान उड्डाण घेणार आहे. यापूर्वी 15 जुलै दिवशी चांद्रयानाचे प्रक्षेपण होणार होते. मात्र काही तांत्रिक त्रृटी असल्याने त्याचे प्रक्षेपण रद्द करण्यात आले होते. आता अखेर इस्त्रोच्या (Indian Space Research Organisation) संशोधकांनी हे दोष दूर करत आपण पुन्हा उड्डाणासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. या चंद्र मोहिमेच्या मदतीने चंद्राच्या दक्षिण धुव्रावर संशोधन केले जाणार आहे. तेथील खनिजांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहिम महत्त्वाची असल्याचं सांगण्यात आले आहे. रविवार (21जुलै) च्या संध्याकाळी 6.43 मिनिटांनी काऊंट डाऊन सुरू झाले आहे. ISROची महत्वाकांक्षी मोहीम Chandrayaan 2 विषयी या 10 खास गोष्टी

चांद्रमोहिम आज दुपारी टेलिव्हिजनवर दूरदर्शन सह इस्त्रोच्या फेसबूक आणि ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून लाईव्ह पाहता येणार आहे. चंद्रयान मोहिमेमध्ये 13 पेलोड आणि 8 ऑर्बिट, 3 लॅन्डर आणि दोन रोव्हर असतील. जीएलएसव्ही मार्क 3 (GSLVMKIII) प्रक्षेपकाद्वारा श्रीहरीकोटा येथून चांद्रयान 2 चे प्रक्षेपण होणार आहे. या प्रक्षेपकाला 'बाहुबली' असं देखील संबोधलं जातं. याची किंमत सुमारे 375 कोटी असून चांद्रयान 2 साठी 603 कोटी खर्च केला आहे. Chandrayaan 2 Launch Live: चंद्रयान 2 चं लाईव्ह लॉंचिंग घसबसल्या कुठे, कधी पहाल?

1- ऑर्बिटर

वजन- 3500 किलो

लांबी- 2.5 मीटर

2- लॅंडर

नाव - विक्रम

वजन- 1400 किलो

लांबी- 3.5 मीटर

3- रोवर

नाव- प्रज्ञान

वजन- 27 किलो

लांबी- 1 मीटर

ANI Tweet

इस्त्रोच्या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार हे चांद्रयान 2 सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चंद्रावर पोहचेल. भारताने पहिले चांद्रयान ऑक्टोबर 2008 साली पाठवले होते. हे यान देखील मानव विरहित होते.