ISRO कडून RISAT-2BR1 सॅटेलाईट लॉन्च, पहा पहिला फोटो
रिसैट-2 बीआर1 याचे वजन जवळजवळ 628 किलोग्रॅम असून तो 576 किमी कक्षेत 37 डिग्री वर स्थापित केला जाणार आहे.
इंडियन स्पेस रिसर्ज ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो (ISRO) यांनी त्यांचा उपग्रह आरआइएसएटी-2बीआर1 (RISAT-2BR1)आणि अन्य 9 विदेशी उपग्रहांना प्रक्षेपित करण्यात आले आहे. रिसैट-2 बीआर1 याचे वजन जवळजवळ 628 किलोग्रॅम असून तो 576 किमी कक्षेत 37 डिग्री वर स्थापित केला जाणार आहे. या सॅटेलाईटमुळे भारताची ताकद अधिक मजबूत होणार असून भारताची सुरक्षा करण्याचे काम करणार आहे. या सॅटेलाईटच्या माध्यमातून दुश्मनांवप सहज लक्ष ठेवता येणार आहे. पीएसएलवी-सी48 आणि 9 अन्य व्यावसायिक उपग्रह सुद्धा या सोबत लॉन्च करण्यात आले आहेत. यामध्ये सहा अमेरिका, अनुक्रमे एक-एक इस्राइल, इटली आणि जपान यांचा समावेश आहे. तर इस्रोकडून या प्रक्षेपणाचा पहिला फोटो सुद्धा झळकावला आहे.
पीएसएलव्ही याच्या 50व्या उड्डाणातून 628 किलो वजनाच्या रिसॅट 2 बीआर 1 उपग्रहाचे 576 किमी कक्षेत प्रक्षेपण करेल. तर कृषी, वन आणि आपत्ती व्यवस्थापनात या उपग्रहाचा फायदा होणार आहे. बुधवारी दुपारी तीन वाजून 25 मिनिटांनी श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून हे प्रक्षेपण करण्यात येत आहे. RISAT-2BR1 Satellite चं प्रक्षेपण; इथे पहा लाईव्ह स्ट्रीमिंग!
भारतीय सेनेचा उपग्रह आरआइएसएटी-2बीआर1 कडून फार मोठा हातभार लागणार आहे. कारण भारताच्या विरोधात कटकारस्थाने रचणाऱ्यांवर आता थेट लक्ष ठेवले जाणार आहे. आता पर्यंत इस्रोकडून 310 विदेशी उपग्रहांना कक्षेत स्थापन केले असून 11 डिसेंबरचे मिशन यशस्वी झाल्यास त्याची संख्या 319 होणार आहे.