Farthest Galaxy of Stars in the Universe: भारतीय संशोधकांनी पृथ्वीपासून 9.3 बिलियन प्रकाशवर्ष दूर असलेल्या नव्या आकाशगंगेचा लावला शोध

दरम्यान ही आकाशगंगा अंदाजे 9.3 बिलियन प्रकाशवर्ष पृथ्वीपासून लांब आहे. अशी माहिती भारत सरकारच्या Department of Space कडून देण्यात आली आहे.

आकाशगंगा। प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

Farthest Galaxy of Stars in the Universe: भारतीय अंतराळ संशोधकांनी पुन्हा एकदा देशवासियांचा ऊर भरून येईल अशी कामगिरी केली आहे. पृथ्वीपासून सुमारे सर्वात दूर असणार्‍या अजून एका आकाशगंगेचा शोध लावण्यामध्ये त्यांना यश आले आहे. दरम्यान ही आकाशगंगा अंदाजे 9.3 बिलियन प्रकाशवर्ष पृथ्वीपासून लांब आहे. अशी माहिती भारत सरकारच्या Department of Space कडून देण्यात आली आहे.

देशाच्या अवकाश क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरींमध्ये आता अजून एका कामाची भर आहे. या संशोधनाबाबत अमेरिकेच्या NASA कडूनदेखील आपली पाठ थोपटण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री डॉ. जीतेंद्र सिंह (Dr Jitendra Singh) यांनी या कामगिरीबद्दल महिती दिली आहे. AUDFs01 या आकाशगंगेचा शोध भारतीयांनी लावला आहे. पुण्याच्या Inter-University Centre for Astronomy and Astrophysics च्या डॉ. कनक सहा यांनी संशोधकांच्या टीमचे नेतृत्त्व केले आहे. ब्रिटनच्या “Nature Astronomy" या जागतिक जर्नलमध्येही आता त्याची माहिती प्रसिद्ध झाली आहे.

Dr Jitendra Singh Tweet

भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशाचा एस्ट्रोसैट/यूवीआईटी (AstroSat/UVIT)ही कामगिरी करण्यासाठी सक्षम होता. दरम्यान यूवीआईटी डिटेक्टर (UVIT Detector) मध्ये पृष्ठभूमीवरील आवाज अमेरिकेच्या नासा (NASA)च्या हबल स्पेस टेलीस्कोप च्या तुलनेमध्ये कमी आहे. नासा कडून याचं कौतुक करताना मानवाच्या कल्याणासाठी नव्या गोष्टींचा शोध लावण्यासाठी एकत्र प्रयोग करणं आवश्यक आहे.