आंतराळात असलेला Asteroid (एस्टेरॉयड) नावाचा महाकाय दगड पृथ्वीच्या कक्षेत येण्याचा धोका निर्माणा झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. आंतराळ संशोधक आणि वैज्ञानिकही Asteroid बाबत चिंतीत आहेत. Asteroid नासाच्या उपग्रहाच्या अगदी जवळून जाणार असल्याने नासा संशोधकांनीही हा प्रकार अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. हा दगड पृथ्वीच्या कक्षेत आल्यास तो पृथ्वीवर आदळू शकतो. असे घडल्यास पृथ्वीवर मोठे संकट निर्माण होऊन तिचा सर्वनाश होण्याचा धोका वर्तवला जात आहे. त्यामुळे अमेरिकेतील आंतराळ संशोधक संस्था नासा Asteroid पासून पृथ्वीचा बचाव कसा करायचा याबाबत विचार करत आहे.
सांगितले जात आहे की, Asteroid (एस्टेरॉयड) हा पृथ्वीसाठी अत्यंत घातक आहे. टेस्ला आणि स्पेसएक्स संस्थापक एलोन मस्क यांनी एक ट्विट करुन इशारा दिला आहे की, 'God of Chaos' आपल्या पृथ्वीच्या दिशेने येत आहे. त्यातून काही धोका निर्माण झाल्यास त्याचा प्रतिकार करण्यासाठी तसेच, त्यापासून बचाव करण्यासाठी आपल्याकडे कोणतीच यंत्रणा नाही. दरम्यान, वैज्ञानिकांनीही छोटे छोटे Asteroid आंतराळात हजारो मैल दूर अंतरावर अंतरावर उडताना पाहिले आहेत.
पृथ्वीसाठी अत्यंत धोकादायक ठरु पाहणाऱ्या Asteroid ला वैज्ञानिकांनी Potentially Hazardous Asteroid-PHA श्रेणीत ठेवले आहे. 340 मीटर इतका मोठा Asteroid 99942 Apophis पृथ्वीच्या कक्षेच्या अगदीच जवळ 19,000 मैल) अंतरावरुन मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. परंतू, त्याने जर मार्ग बदलला आणि तो पृथ्वीवर आदळला तर प्रचंड मोठी हानी होऊ शकते. असे घडल्यास भूकंप आणि त्सुनामी यांसारख्या घटना घडू शकतात. काही ठिकाणी ज्वालामुखी होण्याचाही संभव आहे. ज्यामुळे संपूर्ण मानवी प्रजातच संपू शकते. (हेही वाचा, Chandrayaan 2 पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राकडे झेपावले; 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार)
काय आहे God of Chaos?
God of Chaos हा शब्द इजिप्तमधील एका देवतेच्या नावावरुन घेण्यात आला आहे. God of Chaos म्हणजे 'अराजकतेची देवता'. जी पृथ्वीच्या अगदी जवळ आहे. एस्टेरॉयड (Asteroid) नासाने 99942 एपोफिस असे नाव दिले आहे. सांगितले जात आहे की, 99942 एपोफिस (Asteroid) हा तब्बल 340 मीटर लांबीचा आहे. नासाने टीपलेल्या छायाचित्रांमध्ये हा दगड गोलाकार दिसतो. तो जर पृथ्वीवर आदळला तर सर्वनाश संभव आहे. दरम्यान, अद्याप हे स्पष्ट होऊ शकले नाही की, 340 मीटर लाबीचा हा एस्टेरॉयड (99942 एपोफिस) पृथ्वीसह आंतराळातील कोणत्या ग्रहावर किती परिणाम करेन. परंतू, नासाने दावा केला आहे की, तो पृथ्वीवर आदळल्यास पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर परिणाम होऊ शकतो.
नासाने असाही दावा केला आहे की, God of Chaos एस्टेरॉयड उघड्या डोळ्यांनीह पाहता येऊ शकतो. हा अवकाशात एका अशा किरणांच्या रुपात दिसेन की, जी किरणं अत्यंत वेगवान आणि अधिक प्रकाशमान होत जातील. International Asteroid Research Community ने या घटनेचा खगोलशास्त्रीय पद्धतीने निरिक्षण करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, काही धोका निर्माण झाल्यास त्याचा निपटारा कसा करायचा यावरही विचार करण्यास सुरुवात केली आहे.