Sunita Williams, Butch Wilmore यांना अवकाशामधून परत आणण्यासाठी Donald Trump यांनी मागितली Elon Musk कडे मदत

डिसेंबरमध्ये आणखी एक विलंब झाला, कारण SpaceX ला नव्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टवर काम करण्यासाठी अधिक वेळ हवा होता, ज्याची सुरुवात क्रू-10 च्या प्रक्षेपणापासून होईल.

Donald Trump-Elon Musk

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अवकाशात अडकलेल्या सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बूच विल्मोर (Butch Wilmore) यांना पुन्हा आणण्यासाठी एलन मस्क यांच्याकडे मदत मागितली आहे. याबाबतची माहिती एलन मस्क (Elon Musk) यांनी दिली आहे सध्या हे दोन्ही अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन मध्ये अडकलेले आहेत.

एलन मस्क यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या प्रशासनाने या दोघांना इतके दिवस अंतराळ स्थानकात सोडले हे भयंकर आहे, तर नासाने काही महिन्यांपूर्वी स्पेस एक्स ला त्यांना परत आणण्यास सांगितले होते. दोघांनाही लवकरात लवकर मायदेशी आणू, असेही मस्क यांनी म्हटलं आहे. Sunita Williams यांची प्रकृती खालावतेय? NASA ने अंतराळवीरांच्या आरोग्याबद्दल अपडेट .

एलन मस्क म्हणाले की, नासाने नेहमीच हे दोन अंतराळवीर अडकलेले नाहीत आणि ते निरोगी आणि चांगल्या मूडमध्ये आहेत. सुनीता आणि बुच यांना 2024 मध्ये बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून अंतराळ स्थानकावर पाठवण्यात आले होते, परंतु उड्डाणात काही समस्या आल्या आणि शेवटी असे ठरले की स्टारलाइनर परत जाणे खूप धोकादायक आहे. त्यानंतर, नासाने स्पेसएक्सला त्या दोघांना परत आणण्यास सांगितले.

अवकाशात अडकलेल्या दोघांना परत आणण्यास उशिर का होतो?

बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स जून 2024 मध्ये बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून ISS साठी रवाना झाले होते. केवळ 10 दिवस चाललेल्या या उड्डाणाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.

अंतराळ स्थानकावर पोहोचल्यानंतर, नासा आणि बोईंगने अंतराळयानामधील समस्या समजून घेण्यासाठी काही आठवडे काम केले, परंतु शेवटी निर्णय घेतला की स्टार्टलाइनर क्रूसह परत करणे खूप धोकादायक आहे. त्यानंतर, ऑगस्ट 2024 मध्ये, स्पेस एजन्सीने घोषणा केली की त्यांनी SpaceX ला SpaceX Crew-9 कॅप्सूलमध्ये विल्यम्स आणि विल्मोरला घरी आणण्यास सांगितले आहे.

सप्टेंबरमध्ये स्पेसएक्स ड्रॅगनवर प्रक्षेपित होणाऱ्या चार क्रू सदस्यांपैकी दोन सदस्यांच्या जागी NASA ने क्रू-9 मध्ये दोन अंतराळवीर जोडले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement