Chandrayaan-2: चंद्रावर रोवर प्रज्ञान शाबूत असण्याची शक्यता; NASA ने शेअर केले फोटो, भारताच्या आशा पल्लवित
मात्र आता या घटनेच्या 10 महिन्यांनंतर नासा ने पाठवलेल्या नव्या फोटोंच्या माध्यमातून आता भारतीय संशोधकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
चांद्रयान 2 मिशन (Mission Chandrayaan-2) दरम्यान रोवर प्रज्ञान ला घेऊन रवाना झालेल्या लॅन्डर विक्रमचं चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅन्डिंग करण्याचा प्रयत्न पूर्ण यशस्वी होऊ शकला नव्हता. मात्र आता या घटनेच्या 10 महिन्यांनंतर नासा ने पाठवलेल्या नव्या फोटोंच्या माध्यमातून आता भारतीय संशोधकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. कारण चांद्रयान 2चा विक्रम लॅन्डरचा शोध घेण्यासाठी एंथोसियास्ट शनमुग सुब्रमण्यम (Shanmuga Subramanian)यांनी असा दावा केला आहे की चंद्रयान-2 का रोवर प्रज्ञान चंद्रावर आहे आणि त्याच्यापासून काही अंतरावर विक्रम लॅन्डर आहे. शनमुग सुब्रमण्यम यांच्या दाव्यानंतर आता इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइजेशन देखील कामाला लागली आहे. इस्त्रो चीफ यांची देखील शनमुग सुब्रमण्यम यांच्यासोबत बातचीत झाली आहे.
नासा द्वारा देण्यात आलेल्या माहितीनुसार, सुब्रमण्यम ने केलेल्या ट्वीट नुसार, रोवर प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर आहे. रफ लॅन्डिंगमुळे चंद्रयान 2 चा रोवर प्रज्ञान, विक्रम लॅन्डर पासून वेगळा झाला आहे. त्यामुळे त्याचे कमांड्स पृथ्वीवर येऊ शकत नाहीत. कदाचित त्यांना मेसेज मिळालेदेखील असतील पण रोवर त्याचा रिप्लाय देण्यासाठी सक्षम नसेल, कदाचित त्यामुळेच पृथ्वीवर त्याचा कोणताही संपर्क झाला नसेल.
नासाच्या लूनर रिकॉनसेंस ऑर्बिटरचा फोटो ट्वीट करत त्यांनी व्हाईट डॉट पेलोडचा अतिरिक्त लॅन्डर असू शकतो अशी माहिती दिली आहे. फोटोंमध्ये दिसणारा ब्लॅक डॉट हा रोवर असू शकतो. त्यामुळे चंद्रावर रोवर अजुनही शाबूत असण्याची शक्यता आहे. मागील वर्षी 6 सप्टेंबर ला चंद्रावर सॉफ्ट लॅन्डिंग अपेक्षित होते. मात्र त्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात 69 सेकंद पूर्वी संपर्क तुटला.