Chandrayaan 3 Landing Site चे फोटोज NASA च्या Lunar Reconnaissance Orbiter मधून पहा कसे दिसतात
चांद्रयान-3 लँडिंग साइट चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून सुमारे 600 किलोमीटर अंतरावर आहे.
अमेरिकन स्पेस एजन्सी NASA च्या Lunar Reconnaissance Orbiter (LRO) ने चांद्रयान-3 लँडिंग साइटचे फोटो टिपण्यात आले आहेत. 23 ऑगस्ट रोजी यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यापासून हे यान सध्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ आहे. चांद्रयान-3 लँडिंग साइट चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून सुमारे 600 किलोमीटर अंतरावर आहे.
NASA ऑरिबिटरसोबत जोडलेल्या कॅमेऱ्याने विक्रम लँडरचे चार दिवसांनंतर oblique view (42-डिग्री स्ल्यू अँगल) मिळवले आहेत. 18 जून 2009 रोजी प्रक्षेपित केलेल्या, NASA ऑर्बिटरने आतापर्यंत डेटा गोळा केला आहे, ज्याने चंद्रावरील गोष्टींच्या आधारे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सूक्ष्म दाणेदार मातीचा पृष्ठभाग दिसत असल्याचे त्यांनी निवेदनामध्ये म्हटलं आहे.
23 ऑगस्ट रोजी, भारताने एक मोठी झेप घेतली कारण चांद्रयान-3 लँडर मॉड्यूल चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आणि ऐतिहासिक कामगिरी करणारा पहिला देश बनला आहे. यामुळे चंद्रयान 2 च्या वेळीस झालेले क्रॅश लँडिंगबद्दलची निराशा दूर झाली आहे. Vikram Lander चं चंद्रावर पुन्हा सॉफ्ट लॅन्डिंग; 'Hop Experiment' कामगिरीची ISRO ने दिली माहिती .
पहा फोटोज
लँडिंग केल्यानंतर, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर विविध गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे. ज्यात सल्फर आणि इतर किरकोळ घटकांची उपस्थिती शोधणे, तापमान रेकॉर्ड करणे आणि त्याच्या सभोवतालच्या हालचाली ऐकणे समाविष्ट आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून चांद्रयान-3 द्वारा ‘अॅनाग्लिफ’ फोटोज प्रकाशित केले आहेत.