Chandrayaan 3 Landing Date and Time: चंद्रयान 3 च्या सॉफ्ट लॅडिंगची उत्सुकता; जाणून घ्या कधी, कुठे पहाल थेट प्रक्षेपण

त्यानंतर 5 ऑगस्ट दिवशी लॅन्डरचा चंद्राच्या कक्षेत प्रवेश झाला.

Chandrayan 3

भारताच्या Chandrayaan-3 चा प्रवास आता अंतिम टप्प्यात आहे. काल 20 ऑगस्ट दिवशी देण्यात आलेल्या माहितीनुसार Lander Module चे दुसरे आणि अंतिम डिबुस्टिंग ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले आहे. त्यामुळे रशिया, अमेरिका, चीन नंतर आता भारत हा चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरणार आहे. 23 ऑगस्ट दिवशी चंद्रावर लॅन्डिंग करण्याचा इस्त्रो चा मानस आहे. या ऐतिहासिक लॅन्डिंगची सध्या प्रतिक्षा आहे. इस्त्रोने दिलेल्या मा हितीनुसार 23 ऑगस्ट दिवशी चंद्रयान 3 हे संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी लॅन्डिग करणार आहे.

चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅन्डिग करणार आहे. या सॉफ्ट लॅन्डिग नंतरही चंद्राच्या कक्षेमध्ये propulsion module फिरत राहणार आहे. त्याच्या द्वारा पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे.

कुठे आणि कधी पहाल सॉफ्ट लॅन्डिग?

इस्त्रो ने दिलेल्या माहिती प्रमाणे 23 ऑगस्ट दिवशी संध्याकाळी 6 च्या सुमारास चंद्राच्या दक्षिण धुव्रावर सॉफ्ट लॅन्डिग होणार आहे. या क्षणाचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे. संध्याकाळी 5.27 पासून त्याचे लाईव्ह ब्रॉडकास्ट सुरू केले जाणार आहे. इस्त्रो च्या वेबसाईट प्रमाणेच युट्युब, इस्त्रो चे फेसबूक पेज आणि डीडी नॅशनल टीव्ही चॅनल वर देखील लोकांना थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

14 जुलै दिवशी भारताचं तिसरं चंद्रयान आंध्रप्रदेशातील सतिश धवन स्पेस सेंटर मधून अवकाशामध्ये गेलं. त्यानंतर 5 ऑगस्ट दिवशी लॅन्डरचा चंद्राच्या कक्षेत प्रवेश झाला आणि एक एक टप्पा पार करत त्याचा चंद्रावर उतरण्याचा प्रवास आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif